Skin care : उन्हाळ्यात ‘हे’ कूलिंग फेसपॅक घरी बनवा, त्वचा चमकदार आणि सुंदर होईल !

उन्हाळ्याच्या काळात त्वचेची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. या हंगामात त्वचा कोरडी, लालसर आणि निर्जीव होते. ज्यामुळे आपला चेहरा निस्तेज दिसतो.

Skin care : उन्हाळ्यात 'हे' कूलिंग फेसपॅक घरी बनवा, त्वचा चमकदार आणि सुंदर होईल !
फेसपॅक
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 12:58 PM

मुंबई : उन्हाळ्याच्या काळात त्वचेची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. या हंगामात त्वचा कोरडी, लालसर आणि निर्जीव होते. ज्यामुळे आपला चेहरा निस्तेज दिसतो. लॉकडाऊनमुळे आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नाही आणि फेस पॅक, आणि स्क्रब देखील मिळवू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरी असलेल्या वस्तूंच्या सहायाने फेसपॅक तयार करू शकतो. फेसपॅकमुळे तुमची निर्जीव त्वचा हायड्रेट करण्यात होते.  (Special tips for making cooling facepacks at home in the summer)

पुदीना फेसपॅक फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वात अगोदर पुदीन्याची पाने बारीक वाटून घ्या आणि त्यात हळद आणि पाणी मिसळा आणि मिश्रण तयार करा. यानंतर हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि थोड्या वेळाने ते पाण्याने धुवा.

काकडी फेसपॅक अर्धी काकडी किसून त्यात कोरफड जेल घाला. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि साधारण अर्धा तासानंतर ते पाण्याने धुवा. काकडी त्वचेला हायड्रेटेड ठेवते. त्यातील कोरफड त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते.

मध आणि लिंबाचा फेसपॅक हे मिश्रण करण्यासाठी लिंबाचा रस आणि मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. पेस्ट व्यवस्थित कोरडी झाल्यावर पाण्याने धुवा. लिंबू त्वचेत क्लींजिंग एजंट म्हणून काम करते आणि मध आपली त्वचा मॉइश्चराइझ ठेवते.

दही आणि बेसन फेसमास्क उन्हाळ्यात दही आणि बेसन पीठाचा फेसपॅक लावणे खूप फायदेशीर आहे. या दोन गोष्टी समान प्रमाणात मिसळा आणि पेस्ट बनवा आणि नंतर चेहऱ्यावर लावा. यानंतर ते मिश्रण पाण्याने धुवून घ्या.

अंडी आणि मध फेसपॅक अंड्यातील फक्त पिवळा बलकमध्ये एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि नंतर ते पाण्याने धुवा. त्यात असलेले मध त्वचेला मॉइश्चराइझ ठेवते. हा पॅक वापरल्यानंतर तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होते.

टोमॅटो फेसपॅक टोमॅटो फेसपॅक करण्यासाठी टोमॅटो पेस्ट तयार करा. नंतर त्या पेस्टमध्ये एक चमचा मध घाला. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवा.

(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

(Special tips for making cooling facepacks at home in the summer)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.