Skin care Tips : चमकदार त्वचेसाठी ‘हे’ घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करून पाहा !

आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेऊ इच्छित असल्यास आणि आपली त्वचा नेहमीच चमकदार राहावी, असे वाटत असेल, तर त्यासाठी आपण घरगुती उपचारांचा वापर करणे अधिक चांगले.

Skin care Tips : चमकदार त्वचेसाठी 'हे' घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करून पाहा !
सुंदर त्वचा

मुंबई : आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेऊ इच्छित असल्यास आणि आपली त्वचा नेहमीच चमकदार राहावी, असे वाटत असेल, तर त्यासाठी आपण घरगुती उपचारांचा वापर करणे अधिक चांगले. घरगुती उपचार कोणत्याही प्रकारे आपल्या त्वचेला नुकसान करत नाहीत. कारण, ते पूर्णपणे आयुर्वेदिक असतात आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते देखील खूप चांगले आहेत. (Special tips for soft and glowing skin)

आपण आपल्या त्वचेबद्दल खूप काळजीत आहात, तिची चमक गमावू इच्छित नसाल आणि चमकणारी त्वचा हवी असेल, तर तुम्ही टोमॅटो वापरू शकता. टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. टोमॅटोवर साखर टाका आणि चेहऱ्याला लावा. त्यानंतर वीस मिनिटांनी साधारण चेहरा थंड पाण्याने धुवा.

कच्च्या दुधात प्रथिने, कॅल्शियम असतात. हे चेहऱ्यावर चमक आणते. कच्चे दूध चेहऱ्यावर15 मिनिटे लावा आणि नंतर धुवा. यामुळे त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळेल. एक चमचा दुधामध्ये लिंबाचा रस आणि टोमॅटो मिसळून पेस्ट बनवा. हे पेस्ट चेहर्‍यावर लावल्यानंतर धुवा. यामुळे त्वचा चमकदार दिसेल. टॅनिंग काढून टाकण्यासाठी दही खूप फायदेशीर आहे. 30 मिनिटांसाठी दही चेहऱ्यावर लावा आणि नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर दोन तास चेहऱ्यावर काहीही लावू नका.

गुलाबाचे पाणी चेहऱ्याला लावल्याने चेहरा ताजा दिसतो. चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्यावर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर चमक वाढेल. कोरफडमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात. ते चेहर्‍यावरील अनेक समस्या दूर करतात. चेहऱ्यावर कोरफड लावा आणि थोडावेळ तसेच ठेवा. यानंतर चेहरा धुवा.

यामुळे चेहर्‍यावर ओलावा येतो. हळद आणि बेसन पीठाचे उठणे तयार करण्यासाठी, एक चमचा हळद आणि दोन चमचे बेसन पीठ घ्या. त्यात एक चमचा मलई आणि थोडे दूध मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. बेसन पिठात दहीदेखील मिसळू शकता.

संबंधित बातम्या :

Pain Killer Side Effects | हलक्याशा वेदनांसाठीही ‘पेन किलर’ घेताय? किडनी होऊ शकते निकामी!

Skin Care | त्वचेला चमकदार बनवेल ‘हा’ हेल्दी ज्यूस, जाणून घ्या याचे फायदे…

(Special tips for soft and glowing skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI