AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उचकी का लागते? कारणं आणि घरगुती उपाय एकत्र जाणून घ्या

उचकी ही जरी गंभीर त्रास न वाटणारी गोष्ट असली, तरी ती योग्य वेळी थांबवली नाही तर त्रासदायक ठरू शकते. पुढच्या वेळेस उचकी सुरू झाली, तर या घरगुती उपायांपैकी कुठलाही सहज वापर करा लगेचच आराम मिळेल.

उचकी का लागते? कारणं आणि घरगुती उपाय एकत्र जाणून घ्या
hiccup remediesImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jul 10, 2025 | 1:27 AM
Share

महत्त्वाच्या मीटिंगमध्ये, कोणाशी संवाद साधताना किंवा जेवताना अचानक उचकी सुरू झाली, तर ही छोट्याशा वाटणारी समस्या खूपच अस्वस्थ करणारी ठरते. काही वेळा उचकी काही क्षणांत थांबते, पण कधी ती इतकी जोरात लागते की पाणी प्यायलं, श्वास रोखून धरला तरी काही फरक पडत नाही. अशावेळी अनेकजण वेगवेगळे घरगुती उपाय करून पाहतात. पण तुम्हाला माहिती आहे का, काही पदार्थ असे आहेत जे उचकी लगेच थांबवू शकतात? त्याआधी समजून घेऊया की उचकी येते तरी का?

उचकी का येते?

डॉक्टर सांगतात की उचकी येण्यामागे आपल्या छाती आणि पोटामधील डायाफ्राम या स्नायूंचं अचानक आकुंचन कारणीभूत ठरतं. या आकुंचनामुळे फुफ्फुसांतील हवा जोरात बाहेर फेकली जाते आणि गळ्याजवळील स्वरयंत्र (vocal cords) क्षणभर बंद होतात. त्यामुळे “हिक्” असा आवाज होतो. काही वेळा ही प्रक्रिया आपोआप होते, पण काही विशिष्ट कारणांमुळेही उचकी लागू शकते.

उचकी येण्यामागील शक्य कारणं:

1. खूप वेगात अन्न गिळणं

2. जास्त मसालेदार अन्न खाणं

3. अपचन किंवा गॅसची तक्रार

4. अतिथंड पदार्थ किंवा पेय

5. हवामानात अचानक बदल

6. खूप हसणं किंवा रडणं

उचकी थांबवणारे 5 प्रभावी घरगुती उपाय

1. लिंबाचा आंबटपणा गळ्याच्या मज्जासंस्थेला उचकावतो आणि उचकी थांबते. लिंबाचा तुकडा चावून खा किंवा थोडं रस प्या.

2. मधातील नैसर्गिक एन्झाइम्स गळा आणि डायाफ्राम शांत करतात. एक चमचा मध कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने उचकी कमी होऊ शकते.

3. थोडीशी साखर जीभेवर ठेवून हळूहळू चोचल्याने मेंदूकडे जाणारे सिग्नल बदलतात आणि उचकी आपोआप बंद होते.

4. थंड दही गळ्याच्या नसा शांत करते व उचकी दूर करते.

5. हळूहळू एक ग्लास थंड पाणी प्यायल्याने डायाफ्राम शांत होतो आणि उचकीवर झटपट परिणाम होतो.

उचकी न लागण्सायाठी कोणती काळजी घ्यावी

शरीरावर ताण येतो आणि उचकीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे या काळात स्वतःची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पचनसंस्थेची काळजी घेतली पाहिजे कारण अपचन, गॅस किंवा मसालेदार अन्न उचकी वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे हलकं, घरचं आणि वेळेवर अन्न खाणं आवश्यक आहे. पाण्याची कमतरता होऊ देऊ नका; दिवसाला किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या, जेणेकरून शरीरातील डायाफ्राम योग्य कार्य करू शकेल. तणाव हीदेखील एक प्रमुख कारण आहे, त्यामुळे दररोज काही वेळ ध्यान, योगा किंवा श्वसन व्यायाम करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर खाण्याची घाई न करता सावकाश चावून अन्न खा, जेणेकरून पचन सुरळीत होईल आणि उचकीचा त्रास होणार नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.