रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘स्ट्रॉबेरी’ सुपरफूड, वाचा याबद्दल अधिक !

रात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्ट्रॉबेरी खाण्यासाठी खूप आवडते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'स्ट्रॉबेरी' सुपरफूड, वाचा याबद्दल अधिक !
स्ट्रॉबेरी

मुंबई : घरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्ट्रॉबेरी खाण्यासाठी खूप आवडते. स्ट्रॉबेरी खाण्यासाठी जेवढी चवदार आहे तेवढीच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरी शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी गुणकारी आहे. सध्याचा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तर स्ट्रॉबेरी दररोज खाल्ल्यी पाहिजे. (Strawberry superfood to boost the immune system)

-स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. ज्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांनी तर अगोदर आपल्या आहारात स्ट्रॉबेरी घेतली पाहिजे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपण कधीही स्ट्रॉबेरी खाऊ शकतो. अनेकांचा असा समज आहे की, स्ट्रॉबेरी खाल्ल्याने सर्दी खोकला येतो. मात्र, असे काही होत नाहीतर स्ट्रॉबेरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगली आहे. लहान मुले ज्येष्ठ नागरिक कोणीही स्ट्रॉबेरी खाऊ शकते.

-स्ट्रॉबेरी व्हिटॅमिन आणि फायबरचं प्रमाण मोठ्या असते. यामध्ये पॉलिफेनोल्स नावाच्या अँटी-ऑक्सिडेंट देखील असतात. स्ट्रॉबेरीमध्ये सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसून कमी कॅलरीयुक्त पदार्थ असतात. मात्र, ज्यांना शुगर आहे अशा व्यक्तींनी शक्यतो स्ट्रॉबेरी खाणे टाळावेच कारण स्ट्रॉबेरी जरी चविला आंबट असली तरी देखील त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. यामुळे शक्यतो शुगर असलेल्या व्यक्तींनी स्ट्रॉबेरी खाण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

-स्ट्रॉबेरी खाणे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपली त्वचा अधिक सुंदर आणि तरूण दिसते म्हणून ज्यांना त्वचेच्या काही समस्या असतील तर त्यांनी देखील स्ट्रॉबेरी खाणे चांगले आहे. ज्यांना चेहऱ्यावरील सुरकुत्यांचा समस्या आहेत. त्यांनी स्ट्रॉबेरी खाल्ली पाहिजे. काही दिवसातच चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होईल. इतकेच नाहीतर चेहऱ्यावरील मुरूमाला देखील रामबाण उपाय म्हणजे स्ट्रॉबेरी आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

(Strawberry superfood to boost the immune system)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI