पालकांनो सुधा मूर्ती यांच्या 5 टिप्स मरेपर्यंत लक्षात ठेवा, ऐकाल तर तुमची मुलं…
प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी मुलांना सुसंस्कारी व यशस्वी बनवण्यासाठी ५ महत्त्वाचे पॅरेंटिंग टिप्स दिले आहेत. पालकांनी मुलांसमोर आदर्श उदाहरण कसे बनावे, त्यांना वाचनाची व पैशाची महत्ता कशी शिकवावी, तसेच त्यांच्यात विनम्रता आणि इतरांबद्दल आदर कसा निर्माण करावा हे त्यांनी सोप्या भाषेत सांगितले आहे. मुलांच्या स्वप्नांचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, ज्यामुळे ते आत्मविश्वासाने मोठे होतात.

मुलांना लहानपणापासून चांगलं वळण लावलं तर मोठेपणी ते सुसंस्कारी बनतात असं म्हटलं जातं. पण चांगलं वळण लावायचं म्हणजे नेमकं काय करायचं? उठता बसता मुलांवर ओरडायचं? खेकसायचं? की त्यांना प्रत्येक कामात टोकायचं? त्यांच्या मनात प्रत्येक गोष्टीविषयी भीती घालायची? नेमकं काय करायचं? हे पालकांना कळत नाही. त्यामुळे त्यांना मुलांना कसं वागावयचं समजत नाही. त्याचा परिणाम असा होतो की, हीच मुलं मोठेपणी आत्मविश्वासहिन निघतात. बिथरलेली आणि बिघडलेली असतात. त्यांना थोरामोठ्यांचा मान कसा ठेवायचा हे कळत नाही. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी पाच पॅरेंटिंग टिप्स दिल्या आहेत. त्यामुळे मुलांचं पालनपोषण करणं सोपं जाणार आहे.
मुलांना उदाहरणं द्या
मुलं ऐकण्याऐवजी पाहून अधिक शिकतात. आपल्या व्यवहारात दयाळूपणा, प्रामाणिकपणा आणि सन्मानाचा भाव असला पाहिजे, असं सुधा मूर्ती म्हणतात. आपल्या मुलांसमोर सकारात्मक रोल मॉडल बनण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासमोर आदर्श उदाहरणे ठेवा. आदर्श उदाहरणे त्यांना द्या. एक लक्षात ठेवा, तुम्ही जसं कराल तसंच करण्याचा प्रयत्न तुमचं मूल करणार आहे. त्यामुळे मुलांसमोर कसं वागायचं याचं भान ठेवा.
शिकण्यासाठी प्रोत्साहन द्या
मुलांचं आयुष्य चांगलं बनवण्यासोबतच त्यांचा बौद्धिक विकास करण्यात पुस्तकांचं योगदान अत्यंत मोठं असतं. मुलांना अगदी लगान वयातच बौद्धिक चर्चांमध्ये सामील करून घ्या. तसेच त्यांना आयुष्यभर शिकण्याची आणि वाचनाची आवड लावून द्या. त्यांना तसं करण्यासाठी प्रोत्साहित करा.
पैशाचं महत्त्व शिकवा
मुलांना दिलेल्या पॉकेटमनीचा योग्य उपयोग करायला शिकवा. त्यांच्या मनासारखी वस्तू खरेदी करताना पैशांची बचत कशी करायची हे सुद्धा त्यांना शिकवा. त्यांच्यावर छोट्या छोट्या जबाबदाऱ्या सोपवा. त्यामुळे त्यांच्या कृतज्ञता आणि आर्थिक शिस्त निर्माण होते.
विनम्रता शिकवा
विनम्र मूल नेहमीच इतरांच्या सन्मानास पात्र ठरते. मुलांना यशाने हुरळून न जायला आणि अपयशाने खचून न जायला शिकवलं पाहिजे. कोणत्याही यशानंतर अहंकार येणार नाही याची काळजी घ्यायला सुधा मूर्ती सांगतात. जर्नल ऑफ पॉझिटिव्ह सायकॉलॉजीमध्ये 2017ला एक रिपोर्ट आला होता. त्यात मुलांना विनम्रतेचे धडे आपल्या सहकाऱ्यांकडून अधिक मिळतात. त्यामुळे त्यांचे सहकारी योग्य असावेत असा सल्ला दिलेला आहे.
प्रत्येकाची स्वप्नं निरनिराळी
प्रत्येक आईवडील आपल्या पाल्यांसाठी स्वप्ने पाहतात. आपली मुलं चांगल्या हुद्द्यावर जावीत आणि त्यांच्यात चांगले गुण असावेत असं त्यांना वाटतं. पण ही स्वप्न पाहताना मुलांचीही काही स्वप्ने असतात आणि ती आपल्या स्वप्नांपेक्षा वेगळी असतात हे ते विसरतात. मुलांची स्वप्न आणि आईवडिलांची स्वप्न एकमेकांशी जुळत नाहीत. त्यामुळे आईवडिलांनी मुलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करू द्यावीत हेच नेहमी चांगलं असतं.
