निस्तेज त्वचेसाठी रामबाण उपाय टी ट्री ऑईल आणि गुलाब पाणी, वाचा याचे फायदे…

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 31, 2021 | 10:05 AM

कोरड्या आणि निर्जीव त्वचेच्या समस्येमुळे अनेकजन त्रस्त आहेत. याशिवाय धूळ, सूर्यप्रकाश आणि बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो.

निस्तेज त्वचेसाठी रामबाण उपाय टी ट्री ऑईल आणि गुलाब पाणी, वाचा याचे फायदे…
Follow us

मुंबई : कोरड्या आणि निर्जीव त्वचेच्या समस्येमुळे अनेकजन त्रस्त आहेत. याशिवाय धूळ, सूर्यप्रकाश आणि बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. यामुळे, चेहऱ्यावर काळे डाग, पिटकुळ्या आणि मुरुमांचा त्रास उद्भवण्यास सुरुवात होते. यासर्व समस्यांपासून दूर राहयचे असेल तर टी ट्री ऑईल आणि गुलाब पाणी हे या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी एकमेव रामबाण औषध आहे. (Tea tree oil and rose water are beneficial for the skin)

टी ट्री ऑईल बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक मुरुमरोधक उत्पादनांमध्ये आणि फेस वॉशमध्ये वापरले जाते. या टी ट्री तेलात बेंझोली पेरोक्साइड हा घटक असतो, जो मुरुम कमी करण्यास मदत करतो. मुरुम कमी करण्यासाठी हा एक नैसर्गिक उपचार आहे, ज्यामुळे त्वचेची चामडी निघत नाही किंवा ती लालसरही होत नाही. मुरुमांची समस्या कमी होण्यासाठी कोरफडच्या जेलमध्ये 3 ते 4 थेंब टी ट्री तेल मिसळ आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.

तेलकट त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी टी ट्री तेल वापरले जाते. नारळाच्या तेलाच्या एक तृतीयांश भागामध्ये चटी ट्री ऑईल घाला. दररोज याचा उपयोग केल्याने आपल्या त्वचेवरील पोर्स कमी होतात. तेलकट त्वचा आणि मुरुमांचे मुख्य कारण ही पोर्स आहेत. आपल्या शरीरावर एखादा फोड आल्यास त्यावर टी ट्री ऑईल लावणे खूप चांगले आहे. तुमचे ओठ कोरडे किंवा फुटल्यासही तुम्ही याचा वापर करू शकता. तुमच्या त्वचेला निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास हे तेल खूप मदत करते.

गुलाबपाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतील धुळ माती निघून जाते. मात्र त्यासोबतच तुमच्या त्वचेतील ओलावादेखील कायम राहतो. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो. यासाठीच उन्हाळ्यात त्वचा फ्रेश दिसावी असं वाटत असेल तर घराबाहेर पडताना एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरा आणि सोबत ठेवा. थकवा जाणवू लागल्यास चेहऱ्यावर शिंपडण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे तुम्ही लगेच फ्रेश दिसू शकाल.

जर, आपल्याला घरच्या घरी बनवलेले गुलाबाचे पाणी स्किन टोनर म्हणून वापरायचे असेल, तर 100 मिली स्प्रे असलेल्या बाटलीत 85 मिली गुलाब पाणी घ्या. त्यात 8 ते 10 थेंब लव्हेंडर तेल आणि ग्लिसरीन घाला. वापरापूर्वी नेहमी बाटली व्यवस्थित घुसळा. यामुळे सगळे घटक व्यवस्थित मिक्स होतील.

(टीप : कुठलीही कृती करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Tea tree oil and rose water are beneficial for the skin)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI