Black Fungus : मास्कपासूनही ओढवू शकता म्युकर मायकोसिसचा धोका; जाणून घ्या कशी घ्यायची काळजी

बराच काळ मास्क घालून राहणे म्हणजे काळ्या बुरशीच्या विकासासाठी सुरक्षित जागा निर्माण केल्यासारखेच आहे. (The mask can also pull the risk of mucor mycosis; know how to take care)

Black Fungus : मास्कपासूनही ओढवू शकता म्युकर मायकोसिसचा धोका; जाणून घ्या कशी घ्यायची काळजी
नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 7:14 AM

मुंबई : ब्लॅक फंगस अर्थात काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिस. हा एक वेगळा, परंतु जीवघेणा संसर्ग आहे. आपल्या देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच म्युकर मायकोसिसने डोकेदुखी वाढवली आहे. या काळ्या बुरशीचा सायनसवर परिणाम होऊ शकतो. तसेच मेंदू आणि फुफ्फुसांवरही याचा आघात होऊ शकतो. ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, त्यांच्यासाठी काळ्या बुरशीचा संसर्ग प्राणघातक ठरू शकतो. तथापि, हा रोग कोविड-19 इतका संक्रामक नाही. (The mask can also pull the risk of mucor mycosis; know how to take care)

मास्क वापरताना निष्काळजीपणा टाळा

आपण कोरोनाच्या संकटातून अजून पूर्णपणे बाहेर पडलेलो नाहीत. त्यामुळे या जीवघेण्या विषाणूच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्करुपी शस्त्र आपल्याला इतक्या लवकर खाली ठेवून चालणार नाही. कोविड-19 पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्याला मास्कचा योग्य वापर करणे आवश्यकच आहे, परंतु जर आपण निष्काळजीपणा केला तर गंभीर स्वरुपाचा काळा बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता वाढू शकते.

ओलसर भागात होतो फंगसचा विकास

जेव्हा एखादी व्यक्ती बोलते, तेव्हा मास्क घातलेला असतो, त्यामुळे त्या व्यक्तीच्या तोंडावाटे बाहेर पडणारे थुंकीचे थेंब किंवा वाफ मास्कमुळे रोखली जाऊ शकते. त्यामुळे मास्कच्या आतल्या भागात ओलावा निर्माण होतो. नेमक्या याच ओलसर भागात फंगसचा विकास होऊ शकतो. म्हणजेच काय तर याच ओलसर भागात काळ्या बुरशीचा धोका वाढू शकतो. बराच काळ मास्क घालून राहणे म्हणजे काळ्या बुरशीच्या विकासासाठी सुरक्षित जागा निर्माण केल्यासारखेच आहे. मायक्रोबायोलॉजिस्ट असा दावा करतात की काळ्या बुरशीचे प्रमाण हे 25 ते 35 अंश सेल्सिअसच्या तापमानात वाढते.

सुरक्षेचे उपाय

– मास्क नियमितपणे एंटीसेप्टिक लोशनने धुवा. – बुरशी घालवण्यासाठी सूर्य किरण सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे तुम्ही धुतलेला मास्क काही वेळ उन्हात ठेवा. – कपड्यांचे मास्क घालणे टाळा. कारण ते ओले राहतात आणि तसेच ते धुळीचे कण जास्त काळ आतल्या भागातच रोखून ठेवतात. – मास्कला पुन्हा पुन्हा हात लावू नका. – पाणी पिताना मास्क ओला होणार नाही, याची काळजी घ्या – खोकल्याचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांचा मास्क सहा तास होण्याआधीच बदलणे गरजेचे आहे.

मास्कचे प्रकार

एन-95 : 0.12 मायक्रॉनवाला मास्क सुरक्षित आहे. कारण तो धूळ आणि काळ्या बुरशीपासून बचाव करतो.

सर्जिकल मास्क : हे तीन थरांनी बनलेले मास्क असताते. हे मास्क स्वस्त असतातच, त्याचबरोबर ते विषाणू, जीवाणू आणि बुरशीपासून 80% पर्यंत संरक्षण करतात.

एफएफपी मास्क : हे मास्क बऱ्याच प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. या मास्कमुळे आपल्याला 85 टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळते.

कार्बन मास्क : हे मास्क विषाणूपासून केवळ 10 टक्के तर बुरशीपासून 50 टक्क्यांपर्यंत संरक्षण करतात.

कपड्यांचे मास्क : हे मास्क टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे.

स्पंज मास्क : हे खूप धोकादायक मास्क आहेत. हे मास्क आपल्या तोंडाजवळ काळ्या बुरशीसाठी उपयुक्त अशी जागा बनवू शकतात. या मास्कमुळे विषाणू किंवा धूळीपासून संरक्षण मिळत नाही.

डॉक्टरांचा सल्ला

मास्क दररोज निजंर्तुकीकरण केले पाहिजेत, योग्य मास्क वापरण्याच्या आदेशाचे पालन करावे तसेच स्वत:ची स्वच्छता राखली पाहिजे. (The mask can also pull the risk of mucor mycosis; know how to take care)

इतर बातम्या

टाटांनी बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला थेट टक्कर

5G संदर्भात सरकारचं आणखी एक पाऊल, Jio, Airtel सह ‘या’ बड्या कंपन्यांना स्पेक्ट्रम मंजूर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.