AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dinner mistakes : रात्रीच्या जेवणातील या चुका ठरू शकतात वजन वाढीसाठी कारणीभूत ?

बहुतांश लोक रात्री उशीरा जेवतात आणि झोपतातही खूपच उशीरा. हे आपल्या पचनक्रियेवर नकारात्मक रित्या परिणाम करते व वजनावरही त्याचा परिणाम होतो.

Dinner mistakes : रात्रीच्या जेवणातील या चुका ठरू शकतात वजन वाढीसाठी कारणीभूत  ?
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 18, 2023 | 5:15 PM
Share

नवी दिल्ली : बरेच लोकं आपल्या नियमित दिनचर्येत अशा अनेक चुका करतात, ज्या दिसायला अगदी सामान्य असतात, पण प्रत्यक्षात त्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. रात्रीच्या जेवणादरम्यान (Dinner mistakes) आपल्या काही चुकांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम फक्त आतड्यांच्या आरोग्यावर होत नाही तर झोपेवरही होतो.

तसेच या चुकांमुळे तुम्ही लठ्ठही होऊ शकता. तुम्हालाही वाढलेल्या वजनाचा त्रास जाणवत असेल किंवा वेट लॉस डाएट करूनही योग्य परिणाम दिसत नसेल तर तुम्हीही रात्रीच्या जेवणादरम्यान या चुका करत नाही ना हे तपासा.

रात्रीच्या जेवणातील या चुका वाढवू शकतात तुमचं वजन

  1. रात्री झोपण्याच्या कमीत कमी दीड ते दोन तास आधी जेवल्याने पचनसंस्थेला अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळतो. ते शरीरातील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जसजशी रात्र वाढते तसतसे चयापचय म्हणजेच मेटाबॉलिज्म मंदावते. म्हणूनच रात्री जितक्या लवकर जेवू तितकेच चांगले. त्यामुळे पचन योग्य होते व वजन कमी करण्यासही फायदा होतो. रात्री उशिरा जेवणे हे वजन वाढण्याचे प्रमुख कारण आहे.
  2. रात्रीच्या जेवणात शक्य तितके हलके अन्न पदार्थ खावेत. रात्रीचे जेवण हलके केल्याने अनेक फायदे होतात. विशेषत: त्यामुळे पचन प्रक्रिया संतुलित राहते व ते वजन कमी करण्यास मदत करू शकते. जर तुम्ही वजन कमी करणारा आहार घेत असाल तर तुम्ही तुमचे रात्रीचे जेवण अगदी हलके ठेवावे.
  3. यशस्वी वेट लॉस जर्नीसाठी पुरेशा प्रमाणात प्रोटीन व फायबरचे सेवन गरजेचे आहे. या पोषक तत्वांकडे दुर्लक्ष केल्यास मेटाबॉलिज्मवर प्रभाव पडू शकतो. प्रोटीन आणि फायबर यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते व सारखी भूक लागत नाही. त्यामुळे ते पुरेशा प्रमाणात खावे व ओव्हरइटिंग टाळावे.
  4. जास्त मीठयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. त्यामुळे सोडिअमच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे.
  5. अनेक लोक रात्रीचे जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खातात, पण हे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. गोड, साखरयुक्त मिठाई शरीरात अतिरिक्त कॅलरीज ॲड करते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुळेंचा सरकारला थेट सवाल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल
एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या' - Sanjay Raut
Sanjay raut UNCUT | एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या, तुम्ही...' संजय राऊतांचं अमित शाहांबाबत खळबळजनक विधान
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! PA ने...
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच... भाजपमध्ये मोठ्या घडामोडी
कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके
Commonwealth Game | कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके, ज्युडोपासून भालाफेकीपर्यंत भारतीय खेळाडूंची कमाल
FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
Special Report | Tukaram Mundhe | FDA | मंत्रालयाच्या कँटीनचा भांडाफोड! FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष
शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ, छत्रपती संभाजीनगर...
ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा