AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारतातील ‘ही’ 5 ठिकाणे करा एक्सप्लोर, निसर्गाचे मनमोहक दृश्य करेल तणावमुक्त

आजच्या धावपळीच्या जीवनातील ताण कमी करण्यासाठी अनेकजण बाहेर फिरायला जातात. तुम्ही सुद्धा बाहेर ट्रिपला जाण्याचा प्लॅन करत असाल तर भारतात भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. तुम्ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणांना भेट देऊ शकतात, ज्यांचे दृश्य तुमचे मन मोहून टाकेल. चला तर मग आजच्या लेखात आपण अशा ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात...

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारतातील 'ही' 5 ठिकाणे करा एक्सप्लोर, निसर्गाचे मनमोहक दृश्य करेल तणावमुक्त
place To visitImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Aug 25, 2025 | 2:28 PM
Share

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण खूप तणावात असतो. तर यापासून थोडा वेळ आराम मिळावा यासाठी अनेकजण बाहेर फिरायला किंवा त्यांच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. प्रवास करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यामुळे आपला ताण कमी होतो आणि आपले आरोग्य चांगले राहते. अशातच तुम्ही सुद्धा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आपल्या भारतात भेट देण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. काही लोकांना हिल स्टेशनवर जायला आवडते तर काहींना समुद्रकिनारी जायला आवडते.

जर तुम्ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर भारतातील अशा काही अतिशय सुंदर ठिकाणांबद्दल आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही अजिबात संकोच न करता जाऊ शकता. येथील सौंदर्य तुमचे मन मोहून टाकेल. चला तर मग त्या ठिकाणांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

कालिम्पोंग, पश्चिम बंगाल

हे एक असे हिल स्टेशन आहे जिथे तुम्ही पूर्णपणे तणावमुक्त होऊ शकता. हे हिल स्टेशन पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या पायथ्याशी आहे. हे पूर्व भारतातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ देखील आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर हे महिने येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहेत. तुम्हाला आजूबाजूला हिरवळ आणि तेथील हिरवेगार चहाच्या बागा पाहायला मिळतील. या ठिकाणाचे सौंदर्य तुमचे मन मोहून टाकेल.

मुन्नार, केरळ

केरळ हे भारतातील सर्वात सुंदर राज्य आहे. मुन्नारमधील चहा आणि कॉफीच्या बागांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. येथील शांत वातावरण तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल. तुम्ही मुन्नार येथील काही ठिकाणं एक्सप्लोर केल्यावर तणावमुक्त व्हाल.

गंगटोक, सिक्कीम

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात गंगटोकला भेट देण्याचा हा एक चांगला पर्याय असू शकतो. येथील निसर्ग सौंदर्यात तुम्ही हरवून जाल. ईशान्येकडील या हिल स्टेशनमध्ये तुम्हाला धुक्यांनी झाकलेल्या उंच पर्वतांचे आणि हिरव्या गार निसर्गाचे विहंगम दृश्य पाहता येईल. तुम्ही जगातील तिसऱ्या क्रमांकाचा उंच पर्वत असलेल्या कांचनजंगाला देखील भेट देऊ शकता. येथील सौंदर्य पाहण्यासारखे आहे.

चक्रता, उत्तराखंड

उत्तराखंडमधील चक्राता हे देखील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे . त्याची उंची समुद्रसपाटीपासून 2000 मीटर आहे. तुम्ही येथील नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण तणावमुक्त करेल. सप्टेंबरच्या अर्ध्या ते ऑक्टोबरपर्यंत येथील पर्वत धुक्यांनी वेढलेले असते, ज्यामुळे त्याचे सौंदर्य आणखी मनमोहक दिसते.

ताजमहाल, आग्रा

तुम्ही ताजमहाल पाहण्यासाठी कधीही जाऊ शकता, परंतु उन्हाळ्यात या ठिकाणी जाण्याचे टाळा. कारण येथील कडक उन्हामुळे तुमचा प्रवास खराब होऊ शकतो. परंतु ऑक्टोबरमध्ये ताजमहाल एक्सप्लोर करणे उत्तम राहील. ताजमहाल व्यतिरिक्त, तुम्ही आग्रा किल्ला, मेहताब बाग, जामा मशीद आणि अकबराचा मकबरा देखील पाहू शकता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.