Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ठिकाणांना एप्रिलमध्ये करा एक्सप्लोर आणि एका संस्मरणीय अनुभवासाठी व्हा सज्ज

उन्हाळा सुरू झाला आहे. गरमी पासुन थंड हवामानात फिरायला जाण्याच्या प्रवासाठी एप्रिल हा सर्वोत्तम काळ आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह या सुंदर ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करू शकता. गर्दीपासून दूर, तुम्हाला येथे शांततेत वेळ घालवण्याची संधी देखील मिळेल.

'या'ठिकाणांना एप्रिलमध्ये करा एक्सप्लोर आणि एका संस्मरणीय अनुभवासाठी व्हा सज्ज
Follow us
| Updated on: Mar 17, 2025 | 10:51 PM

एप्रिल हा महिना थंड हवेच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. कारण या दिवसांमध्ये हिल्स स्टेशनचे हवामान चांगले असते, अशातच तुम्ही एप्रिल महिनाच्या गरमीने हैरान झाले असाल तर कुटुंब किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी भारतातच असे काही थंड हवेचे ठिकाण आहेत ज्यांना तुम्ही भेट देऊ शकतात. तसेच या सुंदर निसर्गांच्या सानिध्यात वसलेल्या ठिकाणांना भेट देण्याची योजना आखू शकता.

शहराच्या गर्दीपासून दूर, तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. येथे, रोजच्या कामापासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवून तुमच्या मनाला आराम द्या.

औली

तुम्हाला जर एप्रिलमध्ये थंड ठिकाणी फिरायला जायचे असेल तर तुम्ही औलीला जाऊ शकता. हे उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात वसलेले एक शहर आहे. हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. पर्वतांना वेढलेले ढग, तलाव, धबधबे आणि घनदाट जंगल हे येथील ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतात. अशातच एप्रिलमध्ये येथील तापमान 10°C ते 20°C च्या आसपास असते. येथे तुम्ही नंदा देवी शिखर, औली तलाव, गुरसो बुग्याल, त्रिशूल शिखर अशी अनेक सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासह किंवा मित्रांसह येथे भेट देण्याची योजना आखू शकता.

हे सुद्धा वाचा

माउंट अबू

राजस्थानजवळील माउंट अबू हे भेट देण्यासाठी खूप चांगले ठिकाण आहे. हे अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह भेट देण्याचा प्लॅन करू शकता. तसेच या ठिकाणाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. ज्यामुळे त्याचे सौंदर्य द्विगुणित होते. येथे तुम्ही दिलवाडा जैन आणि लाल मंदिराला भेट देऊ शकता. याशिवाय, तुम्ही गुरु शिखर, नक्की तलाव, अचलगड किल्ला, माउंट अबू वन्यजीव अभयारण्य, टॉड रॉक, पीस पार्क, चाचा संग्रहालय आणि ट्रेव्हर टँक अशा अनेक ठिकाणी देखील भेट देऊ शकता.

ऊटी

तमिळनाडू राज्यातील नीलगिरी जिल्ह्यात असलेले ऊटी हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ एप्रिल महिना आहे. कारण या महिन्यात तेथील नैसर्गिक सौंदर्य सर्वांना मोहित करते. येथे तुम्ही ऊटी तलाव, दोड्डाबेट्टा शिखर, निलगिरी माउंटन रेल्वे आणि बोटॅनिकल गार्डन सारखी ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. निलगिरीच्या सर्वात उंच दोड्डाबेट्टा शिखरावरून दिसणारे दृश्य खूपच मनमोहक आहे. भवानी तलाव हे कमी गर्दीचे आणि शांत ठिकाण आहे. वाटेत अ‍ॅव्हलांच लेक, एमराल्ड लेक येतात. यानंतर या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तेथील निसर्ग सौंदर्य खुपच आल्हादायक वाटेल.

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.