AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त माऊंट अबूच नाही तर राजस्थानमधील ही ठिकाणं जून-जुलैमध्येही असतात थंड, एक्सप्लोर करण्याचा करा प्लॅन

राजस्थान हे उष्ण हवामानाचे राज्य असले तरी, येथे काही ठिकाणी जून आणि जुलै महिन्यांत हवामान खूपच थंड असते. जर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर राजस्थानमधील या थंड वातावरण असलेल्या ठिकाणाला नक्की भेट द्या.

फक्त माऊंट अबूच नाही तर राजस्थानमधील ही ठिकाणं जून-जुलैमध्येही असतात थंड, एक्सप्लोर करण्याचा करा प्लॅन
Mount Abu
| Edited By: | Updated on: Jun 11, 2026 | 2:39 PM
Share

जून आणि जुलै महिन्यात सुद्धा थोडाफार वातावरणात उष्णता असते. तर आता काही दिवसांनी मान्सूनची सुरू होणार आहे. त्यामुळे या आल्हाददायक वातावरणात लोकं अनेकदा थंड ठिकाणांच्या शोधात असतात. साधारणपणे आपण पाहतोच की काहीजण हे हिमाचल किंवा उत्तराखंड मधील ठिकाणं एक्सप्लोर करतात. पण तुम्हाला या ठिकाणांऐवजी इतर कोणते दुसरे ठिकाणं एक्सप्लोर करायचे असेल तेही थंड वातावरण असलेलं तर तुम्‍ही राजस्थानला भेट देऊ शकता. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल… कारण राजस्थानमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी उन्हाळ्याच्या दिवसातही वातावरण थंड असतात. यामध्ये माऊंट अबू, गुरु शिखर आणि राणकपूर यांचा समावेश आहे.

राजस्थानमधील ही थंड ठिकाणे पावसाळ्यात हिरवळीच्या चादरीत न्हाऊन निघतात. ढगांनी वेढलेले डोंगर, थंडगार वारा आणि मनमोहक दृश्ये पर्यटकांना आकर्षित करतात. जर तुम्ही राजस्थानमध्ये ‍फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर या ठिकाणांना नक्की भेट द्या. चला तर मग राजस्थानच्या थंड वातावरण असलेल्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.

राजस्थानमधील माऊंट अबू

भारतातील राजस्थान हे ठिकाणं कडक उष्णतेच्या तापमानासाठी ओळखले जाते. कारण या ठिकाणी उन्हाळ्यात तापमान खूप जास्त असते, त्यामुळे पर्यटक तिथे जाणे टाळतात. मात्र माऊंट अबू हे एक असे ठिकाण आहे जिथे उन्हाळ्यातही हवामान आल्हाददायक असते. पावसाळ्यात येथील निसर्गदृश्य खरोखरच मनमोहक असते. तुम्ही बोंटिग देखील करू शकता, सुंदर डोंगर रागांचा दृश्यांचा आनंद घेऊ शकता आणि दिलवारा मंदिराला भेट देऊ शकता.

गुरु शिखराचे दृश्य

गुरु शिखर हे अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर असून ते समुद्रसपाटीपासून अंदाजे 1,722 मीटर उंचीवर वसलेले आहे. येथून आजूबाजूच्या टेकड्या आणि दऱ्यांची मनमोहक दृश्ये दिसतात. हे ठिकाण उंच ठिकाणी वसलेले असल्यामुळे राजस्थानच्या इतर भागांपेक्षा येथे हवामान खूपच थंड असते. येथे दत्तात्रेय मंदिर देखील आहे, ज्याला तुम्ही भेट देऊ शकता. हे मंदिर देखील भाविकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

राणकपूरमध्ये आल्हाददायक हवामान

राणकपूर हे त्याच्या भव्य जैन स्थापत्यकलेसाठी आणि नैसर्गिक हिरवळीसाठी प्रसिद्ध आहे. अरवली पर्वतरांगांनी वेढलेल्या या परिसरात शांत वातावरण आणि थंड हवामान आहे. प्रसिद्ध राणकपूर जैन मंदिर हे त्याच्या कलात्मक कोरीव संगमरवरी शिल्पांसाठी जगभर ओळखले जाते. आल्हाददायक हवामानाचा आनंद घेण्यासाठी उन्हाळ्यात येथे भेट द्या.

कुंभलगढ हे सुद्धा एक चांगले ठिकाण आहे

कुंभलगढ त्याच्या भव्य किल्ल्यासाठी आणि डोंगराळ परिसरासाठी प्रसिद्ध आहे. उंच अरवली पर्वतरांगांवर वसलेले असल्यामुळे येथील हवामान राजस्थानच्या इतर भागांपेक्षा थंड असते. कुंभलगढ किल्ल्याच्या भिंती जगातील सर्वात लांब तटबंदींपैकी एक मानल्या जातात. पावसाळा आणि हिवाळ्याच्या महिन्यांत या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलते.

तुम्हीही अचलगढला भेट द्या

अचलगढ हे माऊंट अबू जवळ वसलेले एक ऐतिहासिक आणि नैसर्गिक स्थळ आहे. येथील अचलगढ किल्ला आणि प्राचीन मंदिर पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. डोंगराळ भागात वसलेले असल्यामुळे येथील हवामान वर्षभर आल्हाददायक असते. सभोवतालची हिरवळ आणि शांत वातावरणामुळे हे निसर्गप्रेमींसाठी एक विशेष ठिकाण ठरते.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले