Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Travel & Tourism Festival 2025 : भारताचा पहिला जागतिक प्रवास आणि पर्यटन महोत्सव लवकरच !

भारताचा पहिला जागतिक पर्यटन महोत्सव 14-16 फेब्रुवारी 2025 ला दिल्लीत होणार आहे. TV9 आणि रेड हॅट कम्युनिकेशन्स आयोजित करत असलेला हा तीन दिवसीय कार्यक्रम B2C पर्यटन क्षेत्रासाठी एक अनोखे व्यासपीठ असणार आहे. पर्यटक, ब्रँड्स आणि टूर ऑपरेटर्सना एकत्र आणणारा हा महोत्सव प्रवास क्षेत्रातील नवीन प्रवाहांचा आढावा घेईल.

World Travel & Tourism Festival 2025 : भारताचा पहिला जागतिक प्रवास आणि पर्यटन महोत्सव लवकरच !
World Travel & Tourism Festival 2025Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 17, 2025 | 5:13 PM

नवी दिल्ली : भारताचा पहिला वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हल येत्या 14 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडणार आहे. टीव्ही9 नेटवर्क आणि रेड हॅट कम्युनिकेशन्सच्या संयुक्त विद्यमाने हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवातून प्रवासाची व्याख्याच बदलली जाणार आहे. भारतात अशा प्रकारचा B2C प्रवास आणि पर्यटन संबंधित कार्यक्रम हा पहिल्यांदाच आयोजित केला जात आहे. पर्यटक, पर्यटन मंडळे आणि ब्रँड्स यांना एकाच छताखाली एकत्र आणून एक अनोखे प्लॅटफॉर्म निर्माण करणे हा या महोत्सवामागचा मुख्य हेतू आहे.

कोव्हिडनंतरच्या काळात जगभरातील पर्यटन उद्योगात भारतीय पर्यटकांची महत्त्वपूर्ण भागीदारी दिसून आली आहे. वाढते उत्पन्न आणि अनोख्या अनुभवांच्या शोधासाठी भारतीय नागरिकांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाकडे कल वाढला आहे, असं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. विदेशी प्रवासाच्या बाबतीत भारतीय पर्यटकांचा कल सुमारे 85 टक्क्यांनी वाढला आहे. जागतिक प्रवास आणि पर्यटनावर आधारित तीन दिवसीय या विशेष कार्यक्रमात, सहभागी ब्रँड्स एका अनोख्या अनुभवाचा भाग होतील. तसेच, प्रवास टूर ऑपरेटरसोबत B2B मीटिंग्सची व्यवस्था असेल.

World Travel & Tourism Festival 2025

World Travel & Tourism Festival 2025

तसेच, ट्रॅव्हल ट्रेड अ‍ॅवॉर्ड्स, आकर्षक कार्यक्रम आणि ग्राहक आणि ब्रँड्स यांच्यात थेट संवादासाठी ‘टॉकिंग विंडोज’ असे पर्यायी कार्यक्रम असणार आहेत.

भारताच्या पहिल्या जागतिक प्रवास आणि पर्यटन महोत्सवाचे उद्दिष्ट म्हणजे एकाच छताखाली देशातील अग्रगण्य B2C ब्रँड्सना एकत्र आणणे. याशिवाय, नृत्य, संगीत, खाणंपिणं आणि इतर मनोरंजनाचेही आयोजन करण्यात येणार आहे.

पर्यटकांच्या प्रवासाचा आढावा

जगभर प्रवास करणारे भारतीय : कोव्हिड नंतर भारतीय आंतरराष्ट्रीय प्रवासात 85 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मोठे खर्च करणारे पर्यटक: भारतीय पर्यटक प्रति ट्रिप सरासरी 1,200 अमेरिकन डॉलर्स खर्च करतात.

टेक सॅव्ही मिलेनियल्स: 50 टक्के भारतीय आंतरराष्ट्रीय पर्यटक हे मिलेनियल्स किंवा जेनरेशन झेड आहेत. ते बुकिंगसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करतात.

डोमेस्टिक हवाई प्रवासाची वाढ: 2023 मध्ये भारतातील डोमेस्टिक हवाई प्रवास क्षमतेत 110 टक्क्यांची वाढ झाली.

लक्झरी प्रवास खर्चाची वाढ: 2023 मध्ये भारतातील डोमेस्टिक लक्झरी प्रवास खर्च 12 टक्क्यांनी वाढला.

खासगी विमानांची मागणी: 2023 मध्ये भारतात खासगी जेट्सची मागणी 15 टक्क्यांनी वाढली.

वेलनेस रिसॉर्ट्ससाठी वाढती मागणी : भारतात वेलनेस टुरिझम वाढत आहे. श्रीमंत पर्यटक मनोबल वाढवणाऱ्या अनुभवांचा शोध घेत आहेत.

फॅमिली सेंट्रीक पर्यटन: 60 टक्क्यांहून अधिक भारतीय पर्यटक कुटुंबासोबत सुट्टी घालायला प्राधान्य देतात.

World Travel & Tourism Festival 2025

World Travel & Tourism Festival 2025

महोत्सवासाठी 30,000 चौरस फुटांच्या क्षेत्रात इंटरेक्टिव झोन स्थापन करण्यात येणार आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटन मंडळे, राज्य पर्यटन प्रतिनिधी, एअरलाइन कंपन्या आणि इतर छोट्या मोठ्या संस्थांचा सहभाग असेल. विविध देशांच्या खाद्यपदार्थांची रेलचेल काय कार्यक्रमात असणार आहे. प्रवासाच्या प्रवृत्तींवर, उदयोन्मुख गंतव्यस्थळे आणि अन्य अनेक गोष्टींवर तज्ज्ञांचे संवाद होतील. ट्रॅव्हल फोटोग्राफी, संस्कृती आणि प्रवास नियोजन यावर विविध सत्रं आयोजित केली जातील. प्रवास आणि पर्यटन विभागास अधिक पुढे नेण्यासाठी सतत काम करणाऱ्या व्यक्तींनाही सन्मानित केले जाईल.

परदेशी प्रवासासाठी या महोत्सवामुळे भारतीय पर्यटकांना नवीन दरवाजे उघडतील, याशिवाय 100 पेक्षा अधिक इन्फ्लुएन्सर्स आणि विदेशी प्रवासाशी संबंधित आकर्षक ऑफर्सही उपलब्ध असतील. एकूणच, या कार्यक्रमाने विदेशी प्रवासासाठी एक अनोखा अनुभव देण्याचे आश्वासन दिले आहे.

World Travel & Tourism Festival 2025

World Travel & Tourism Festival 2025

प्रवास चर्चासत्र : प्रवासाच्या प्रवृत्तीं आणि उदयोन्मुख गंतव्यस्थळांवर उद्योग तज्ज्ञांच्याकडून माहितीपूर्ण चर्चासत्रं.

कार्यशाळा : प्रवास फोटोग्राफी, सांस्कृतिक अनुभव आणि ट्रिप नियोजनावर सत्रं.

व्हर्च्युअल रिअलिटी अनुभव : जगभरातील गंतव्यस्थळांचे इमर्सिव्ह पुनरावलोकन

अवॉर्ड्स समारंभ : प्रवास आणि पर्यटन उद्योगातील उत्कृष्टतेला सन्मानित करणारा समारंभ

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.