AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोपण्यापूर्वी खा केवळ दोन खजूर, होतील अनेक फायदे!

खजूर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर असतात.

रात्री झोपण्यापूर्वी खा केवळ दोन खजूर, होतील अनेक फायदे!
| Edited By: | Updated on: Apr 21, 2021 | 7:09 AM
Share

मुंबई : खजूर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर असतात. हे केवळ आपल्या प्रतिकारशक्तीलाच चालना देत नाही तर आपल्याला बर्‍याच रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते. आपण दररोजच्या आहारात खजूरचा समावेश करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात खजूर खाण्याचे नेमके कोणते फायदे आपल्या आरोग्याला होतात. (Two at night before bed Eating date palm is beneficial for health)

हाडे मजबूत बनवते खजूरामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. हे हाडांसाठी फायदेशीर आहे, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. तसेच हाडांशी संबंधित समस्यांना देखील यामुळे कमी होतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर दररोज खजूर खाणे डोळ्यांसाठी चांगले आहे. खजुरामध्ये व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे ज्यांना डोळ्यांसंबंधीत काही त्रास आहे अशांनी खजूर खाल्ल्ये पाहिजे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते खजूरमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोईड्स, फिनोलिक अॅसिड असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे आपल्या त्वचेला फायदा होतो.

निरोगी हृदयासाठी आयुर्वेदानुसार, खजूर एक चमत्कारी औषध असून यामुळे अनेक रोगांवर उपाय केले जातात. शारिरीक कमजोरी, शरीरात रक्ताची कमी किंवा हृदयरोग, जास्त तहान लागण्याची समय्या या सर्वांवर खजूर तुम्हाला मदत करु शकतो.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर वजन कमी करण्यासाठी खजूर अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खजूरचे सेवन केले पाहिजे.

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर खजूरमध्ये व्हिटॅमिन ई असते. जे केसांना निरोगी आणि वाढण्यास मदत करते. खजूरमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी देखील असते. यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होते.

(महत्त्वाचं : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण आहाराबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

Skimmed  Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…

(Two at night before bed Eating date palm is beneficial for health)

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.