AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाम्पू विसरा… केस लांब, दाट आणि चमकदार होण्यासाठी ‘या’ नैसर्गिक घटकांनी करा हेअरवॉश

तुम्हालाही तुमचे केसांची चमक तसेच लांबसडक आणि मजबूत केस हवे असतील तर आजच्या लेखात आपण अशा काही नैसर्गिक घटकांबद्दल जाणून घेऊयात ज्यांच्या मदतीने तुम्ही हेअरवॉश करून केस चमकदार दिसतील.

शाम्पू विसरा... केस लांब, दाट आणि चमकदार होण्यासाठी 'या' नैसर्गिक घटकांनी करा हेअरवॉश
Hair WashImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Mar 24, 2026 | 9:50 PM
Share

केस लांबसडक आणि काळेभोर असावे असं अनेकांना वाटतं. मात्र बदलते जीवनशैली, प्रदूषण आणि कामांचा ताणतणाव यामुळे यांचा परिणाम केसांवर सर्वात जास्‍त होतो आणि यामुळे केस गळणे, अकाली पांढरे आणि विरळ होत जाण्याची समस्या वाढत आहे. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण महागडे शॅम्पूचा वापर करतात. तर यातील काही हेअर प्रोडक्ट देखील खूप महाग असतात. अशातच या प्रोडक्टचा तात्पुरता परिणाम पाहायला मिळतो. मात्र केस धुण्यासाठी तुम्ही शॅम्पू वापरण्यापूर्वी काही नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास हे घटक केवळ तुमचे केस खोलवर स्वच्छ करत नाहीत, तर त्यांचे पोषणही करतात आणि केसांच्या वाढीस मदत करतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नैसर्गिक घटक खूप फायदेशीर असतात, कारण ते केमिकलमुक्त असतात. चला तर मग आजच्या लेखात आपण केसांच्या वाढीसाठी कोणत्या नैसर्गिक घटकांचा वापर करावा ते जाणून घेऊयात.

रीठा, आवळा आणि शिकेकाई : प्राचीन काळापासून केस धुण्यासाठी रीठा वापरला जात आहे. तसेच अनेक नैसर्गिक हेअर प्रोडक्टमध्येही रीठा आवळा आणि शिकेकाईचा वापर केला जातो. कारण रीठाच्या वापराने शॅम्पूप्रमाणे फेस येतो. रीठ्यामध्ये आवळा आणि शिकेकाई मिक्स करून केस धुतल्यास त्याचे आणखी जास्त फायदे तुमच्या केसांना व स्कॅल्पला होतात. हे तिन्ही घटक तुमच्या केसांसाठी वरदान आहेत. यामुळे केस काळे होण्यास आणि त्यांची लांब वाढण्यास खूप मदत होते.

मुलतानी माती + लिंबू : मुलतानी माती केस धुण्यासाठी आणखी एक उत्तम नैसर्गिक घटक आहे. याकरिता मुलतानी माती एक तास पाण्यात भिजवून ठेवा, किंवा जर ती पावडरच्या स्वरूपात असेल, तर तुम्ही ती थेट पाण्यात मिक्स करू शकता. आता यामध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट केसांना मुळापर्यंत लावा यामुळे तुमचे केस खोलवर स्वच्छ होतील आणि कोंडा होण्यास प्रतिबंध होईल. केस धुतल्यानंतर येणारा कोरडेपणा टाळण्यासाठी इच्छित असल्यास तुम्ही त्यात थोडे कोरफडीचे जेल मिक्स करू शकता.

ॲपल सायडर व्हिनेगर : तुम्ही केस धुण्यासाठी शॅम्पूऐवजी अॅपल सायडर व्हिनेगर, जो एक नैसर्गिक घटक आहे त्याचा वापर करू शकता. कारण यामध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत. त्यामुळे याने केस धुण्यासाठी 2 ते 3 चमचे व्हिनेगर पाण्यात मिक्स करा आणि ते मिश्रण संपूर्ण केसांना लावा. 2ते 3 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा.

बोराच्या झाडांची पाने : तुम्हाला हे कदाचित माहित नसेल, पण तुम्ही बोराच्या झाडांच्या पानांनी सुद्धा केस धुवू शकता. कारण तुम्ही बोराची पाने हातावर चोळल्याने त्याचा फेस तयार होतो. तुम्ही ती पाने वाटून किंवा त्यांचे लहान तुकडे करून केस धुण्यासाठी वापरू शकता. यामुळे तुमची स्कॅल्प निरोगी राहते आणि केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

अवापुही (झिंगीबर झेरम्बेट) : ही वनस्पती ‘पाईन कोन जिंजर’ किंवा ‘शॅम्पू जिंजर’ म्हणून ओळखली जाते . हे एक सुगंधी कडू आल्याचे फूल आहे, ज्याचा रस नैसर्गिक शाम्पू आणि कंडिशनर म्हणून केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. या फुलांतून निघणार घट्ट द्रव केसांचा कोरडेपणा दूर करून केसांना मऊ आणि चमकदार बनवतो. त्यामुळे तुम्ही केसांना कंडिशनिंग करण्यासाठी हेअर वॉशमध्ये याचा वापर करू शकता. तुम्ही हे फूल घरी सहजपणे वाढवू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड