70% बाधित मुलांना मिळत नाही डोनर, इतका भयंकर जीवघेणा ठरतो थॅलेसिमिया आजार

थॅलेसिमिया या आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना प्रत्येकी 20 ते 25 दिवसांमध्ये कमीत कमी एक युनिट रक्ताची गरज भासते. या आजारापासून वाचण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावी लागते परंतु यासाठी सहजच डोनर उपलब्ध होत नाही.

70% बाधित मुलांना मिळत नाही डोनर, इतका भयंकर जीवघेणा ठरतो थॅलेसिमिया आजार
Blood Pressure
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 5:54 PM

देशभरात प्रत्येक वर्षी हजारो मुलांना थॅलॅसिमिया (Thalassemia) हा आजार होतो. या आजारामुळे अनेक लहान मुले बळी पडतात. शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे हा आजार अनेक मुलांना जडतो तसेच वेळेवर रक्त मिळाले नाही तर अनेकांचा मृत्यू देखील या आजारामुळे होतो. जी मुलं या आजाराचा सामना करतात, त्यांचे जीवन सोपे नसते. त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. डॉक्टरांच्या मते, हा एक जेनेटिक आजार (Genetic Disease) आहे, याचा अर्थ आई वडिलांकडून हा आजार मुलांमध्ये पसरतो. बाळ जन्मल्यानंतर सहा ते आठ महिन्यांमध्ये या आजाराचे लक्षणे दिसून येतात थॅलेसिमिया बाधित असणाऱ्या मुलाच्या शरीरामध्ये लाल रक्त पेशी वेगाने कमी होत जातात आणि नवीन पेशींची निर्मिती देखील होत नाही. या कारणांमुळे या मुलांच्या शरीरात नेहमी रक्ताची कमतरता निर्माण होत असते. या आजारपणात आरबीसी (RBC) फक्त 10 ते 25 दिवसापर्यंत शरीरामध्ये टिकतात. सर्वसामान्य शरीरामध्ये 125 दिवसापर्यंत आरबीसी जिवंत राहतात म्हणूनच या आजाराने त्रस्त असणाऱ्या मुलांना 20 ते 25 दिवसानंतर रक्त चढवावे लागते.

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल येथील पीडियाट्रिक हीमटोलॉजी विभागाचे डॉ. गौरव खारया यांनी सांगितले की, देशात प्रत्येक वर्षी असे 10 हजार नवीन घटना समोर येतात. यापेक्षा 3 पटीने जास्त रुग्ण सिकल सेल चे दिसून येतात. या रुग्णांना आयुष्यभर ब्लड ट्रांसफ्यूजन आणि आयरन चिलेशन ची आवश्यकता लागते. या दोन्ही रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे एक मात्र उपचार आहे परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी की, फक्त 20 ते 25 टक्के रुग्णांना त्यांच्या परिवाराकडून एचएलए आयडेंकिल डोनर सहज उपलब्ध होतात यामुळे रुग्णांचे ट्रान्सप्लांट होत नाही. ट्रान्सप्लांट न झाल्यामुळे रुग्णाला नियमित रक्ताची गरज भासते व रुग्णाला नेहमी शरीरात रक्त चढवावे लागते. वारंवार शरीरामध्ये रक्त चढवल्यास रुग्णाच्या शरीरावर विपरीत परिणाम देखील दिसून येतात.

बाल रोग विशेषज्ञ डॉ. प्रदीप कुमार यांच्या मते, थॅलेसिमिया असे दोन प्रकार असतात.एक सौम्य असतो आणि एक भयंकर तीव्र प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. सौम्य थॅलेसिमिया च्या प्रकारांमध्ये लहान मुलांना जास्त त्रास सहन करावा लागत नाही परंतु तीव्र थॅलॅसिमिया मध्ये मुलाला प्रत्येक 20 ते 25 दिवसांनंतर एक युनिट रक्त चढवावे लागते. वारंवार रक्त चढवल्याने अनेकदा शरीरामध्ये आयरन सुद्धा वाढून जाते त्यामुळे अन्य आजार होण्याची शक्यता असते. तीव्र थॅलेसेमिया बाधित असणाऱ्या मुलाला बोन मॅरो ट्रान्सप्लांट साठी डोनर सहज उपलब्ध होत नाही. या कारणामुळे अनेक मुलं आयुष्यभर या आजाराला सामोरे जात असतात.

या गोष्टींची विशेष काळजी घ्या

डॉ. प्रदीप यांच्या मते, जर तुम्ही बाळाचा विचार करत असाल तर अशा वेळी संपूर्ण चाचणी करायला पाहिजे.ज्यामुळे तुम्हाला कळून येईल की, आपल्याला कोण कोणते आजार आहेत किंवा नाही. प्रेग्नेंसी अगोदरच योग्य त्या चाचण्या केल्यावर आपल्याला थॅलेसेमिया आजार बद्दल देखील माहिती मिळू शकते तसेच तुम्ही प्रेग्नेंसी दरम्यान सुद्धा ही टेस्ट करू शकतात. ही टेस्ट केल्याने तुम्हाला कळून चुकेल की बाळाला रक्ता संदर्भातील कोणता आजार आहे की नाही. याबद्दल ची सविस्तर माहिती देखील चाचणीद्वारे कळून येते.

थॅलॅसिमिया चे लहान मुलांमध्ये आढळणारी लक्षणे

नेहमी कमजोरी जाणवणे अशक्तपणा जाणवणे नखं, डोळे आणि जिभेवर पिवळा थर जमा होणे मुलांची वाढ न होणे

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.