AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परफ्यूम खरेदी करताय? EDT, EDP आणि EDC कशासाठी लिहिले जातात हे आधी जाणून घ्या !

परफ्यूमची बाटली घेताना त्यावर लिहिलेलं EDT, EDP किंवा EDC हे तुम्ही पाहिलंच असेल. पण या शब्दांचा अर्थ अनेकांना ठाऊक नसतो. प्रत्यक्षात हे शब्द परफ्यूममधील सुगंधी तेलाच्या प्रमाणावर आधारित असतात आणि त्यामुळेच परफ्यूम किती वेळ टिकेल हे ठरवलं जातं. योग्य परफ्यूम निवडण्यासाठी हे शब्द समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या वेळी परफ्यूम घेताना ही माहिती नक्की लक्षात ठेवा कारण ती तुमच्या वापराच्या गरजेनुसार सर्वोत्तम परफ्यूम निवडण्यास मदत करेल.

परफ्यूम खरेदी करताय? EDT, EDP आणि EDC कशासाठी लिहिले जातात हे आधी जाणून घ्या !
| Edited By: | Updated on: Jun 20, 2025 | 3:45 PM
Share

परफ्यूमचा वापर आज जवळपास प्रत्येक व्यक्ती करतो. दररोज ऑफिस, कॉलेज किंवा कुठल्याही इव्हेंटला जाताना आपण स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी आणि घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी परफ्यूम वापरतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की परफ्यूम किती वेळ टिकेल हे कसं ठरवलं जातं? आणि परफ्यूमच्या बाटलीवर ‘EDT’, ‘EDP’, किंवा ‘EDC’ असे गूढ वाटणारे शब्द का लिहिलेले असतात?

परफ्यूम खरेदी करताना अनेकांना बाटलीवर लिहिलेले EDT, EDP किंवा EDC याचे अर्थ माहित नसतात. पण ही लघुरुपं म्हणजे परफ्यूमच्या सांद्रतेची (concentration) पातळी. म्हणजेच त्यात सुगंधी तेल (Fragrance Oil) किती प्रमाणात आहे, यावरून परफ्यूम किती वेळ टिकेल हे ठरते.

EDT म्हणजे काय?

Eau De Toilette (EDT) हा फ्रेंच शब्द असून यामध्ये 5 ते 15 टक्के पर्यंत फ्रेग्रेन्स ऑईल असतं. यामुळे हा परफ्यूम हलका आणि फ्रेश वाटणारा असतो. त्याची खुशबू 3 ते 5 तासांपर्यंत टिकते. त्यामुळे EDT चा वापर दररोज ऑफिस किंवा कॉलेजसाठी योग्य मानला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये EDT हे एक उत्तम पर्याय ठरतो.

EDP म्हणजे काय?

Eau De Parfum (EDP) हे परफ्यूम तुलनेने अधिक प्रबल असते. यामध्ये 15 ते 20 टक्के फ्रेग्रेन्स ऑईल असतं. त्यामुळे त्याचा सुगंध अधिक वेळ टिकतो जवळपास 6 ते 8 तासांपर्यंत. ईडीपी परफ्यूम विशेष प्रसंग, पार्टी किंवा नाईट आउटसाठी खूपच योग्य मानलं जातं.

EDC म्हणजे काय?

Eau De Cologne (EDC) हा परफ्यूम खूपच हलका असतो. यामध्ये केवळ 2 ते 5 टक्के फ्रेग्रेन्स ऑईल असते. त्यामुळे त्याचा सुगंध लवकरच निघून जातो. EDC चा वापर तुम्ही दररोज करू शकता, पण त्यासाठी दिवसातून २-३ वेळा ते पुन्हा लावण्याची गरज असते. याची किंमत तुलनेने कमी असते, त्यामुळे तो एक बजेट-फ्रेंडली पर्याय आहे.

परफ्यूम खरेदी करताना काय लक्षात घ्यावं?

जर तुम्ही दिवसभर टिकणारा परफ्यूम शोधत असाल तर EDP निवडा. ऑफिससाठी EDT एक चांगला पर्याय आहे, तर स्वस्तात परफ्यूम हवा असेल आणि तुम्ही वारंवार लावण्यास तयार असाल, तर EDC देखील चालेल. पण प्रत्येक वेळी बाटलीवर लिहिलेलं EDT, EDP किंवा EDC वाचणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं हे तुमच्या खरेदीसाठी फार उपयोगी ठरू शकतं.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. )

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.