ब्रँडीच्या बाटलीवरील VS, VSOP, XO कोडचा नेमका अर्थ काय? दररोज पिणाऱ्यांनाही माहिती नसेल
Brandy Bottle Code Meaning: ब्रँडीच्या बाटलीवर अनेक कोड लिहिलेले असतात. मात्र हे कोड बाटलीचे सौंदर्य वाढवण्यासाठी नसतात तर त्यात महत्त्वाची माहिती दडलेली असते. हे कोड का वापरले जातात आणि त्यांचा अर्थ काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

अनेकांना ब्रँडी पिण्याची आवड असते. मात्र आपण ब्रँडीबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ब्रँडीच्या बाटलीवर अनेक कोड लिहिलेले असतात. मात्र हे कोड बाटलीचे सौंदर्य वाढवण्यासाठी नसतात तर त्यात महत्त्वाची माहिती दडलेली असते. ब्रँडीच्या बाटल्यांवर VS, VSOP आणि XO हे कोड लिहिलेले असतात. या तिन्ही कोडचे वेगवेगळे अर्थ आहेत. हे कोड का वापरले जातात आणि त्यांचा अर्थ काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
ब्रँडीच्या कोडबाबत बोलताना वाइन तज्ञ सोनल हॉलंड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘ब्रँडीच्या बाटलीवरील VS, VSOP आणि XO हे कोड ब्रँडीचे वय आणि गुणवत्ता सांगतात. यातून ही वाईन किती जूनी आणि किती प्रिमियम हे ठरले जाते. प्रत्येक कोडचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊयात.
VS – खूप खास
VS (Very Special) कोडचा अर्थ खूप खास असा आहे. या प्रकारातील वाईन रिलीज होण्यापूर्वी ते दोन वर्षांपासून स्टोअरमध्ये साठवलेली असते. यामुळे वाईनच्या चवीवर देखील परिणाम होतो. या वाईनच्या चवीत फळांचा सुवास असतो. याचाच अर्थ ही सर्वात नवीन ब्रँडी असते.
VSOP – व्हेरी सुपीरियर ओल्ड पेल
VSOP म्हणजे व्हेरी सुपीरियर ओल्ड पेल. या बाटलीतील वाईन व्हेरी स्पेशल कोडपेक्षा जास्त काळ स्टोअर केलेली असते. या बाटलीतील वाईन ही 4 वर्षांपेक्षा जास्त काळ स्टोअर करून ठेवलेली असते. त्यामुळे या वाईनची चव ही व्हेरी स्पेशल कोडपेक्षा वेगळी आणि चांगली असते.
XO – एक्स्ट्रा ओल्ड
XO कोडचा अर्थ एक्स्ट्रा ओल्ड असा आहे. हा कोड प्रीमियम ब्रँडीसाठी वापरला जातो. ज्या बाटलीवर हा कोड असतो त्यातील वाईन ही कमीत कमी 10 वर्षे स्टोअर केलेली असते. त्यामुळे त्या ब्रँडीला सर्वात चांगली चव आलेली असते. ही सर्वात प्रिमियम ब्रँडी म्हणून ओळखली जाते.
ब्रँडी जास्त काळासाठी का स्टोअर केली जाते?
अनेकांना प्रश्न पडला असेल की ब्रँडी जास्त काळासाठी का साठवली जाते आणि यामुळे काय फायदा होता? याचे उत्तर म्हणजे ब्रँडी जास्त काळासाठी स्टोअर केल्यास त्याची चव, दर्जा आणि सुगंध सुधारतो. यामुळेच एक्स्ट्रा ओल्ड कोड असलेली ब्रँडी अधिक महाग असते. यामुळे जी ब्रँडी जास्त काळ साठवलेली असते तिच्यावर XO हा कोड लिहिलेला असतो.
