AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एखाद्याला विषबाधा झाल्यानंतर सर्वात आधी काय करावं? जाणून घ्या तात्काळ उपाय

घरी चुकून किंवा हेतुपुरस्सर विष घेतल्याच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात. अशा प्रसंगी कोणताही वेळेवर प्राथमिक उपचार जर भेटला नाहीतर काय कराल, हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया विषप्रयोगाच्या प्रसंगी काय लक्षात ठेवावं लागते.

एखाद्याला विषबाधा झाल्यानंतर सर्वात आधी काय करावं? जाणून घ्या तात्काळ उपाय
विष सेवन केल्यानंतर सर्वात आधी काय करावं? जाणून घ्या तात्काळ उपायImage Credit source: Tetra Images/Getty Images
| Edited By: | Updated on: Jul 14, 2025 | 3:53 PM
Share

घरात अनेक वेळा अशा वस्तू असतात ज्या विषारी असतात जसे की झोपेच्या गोळ्या, कीटकनाशके, फिनाईल किंवा उंदीर मारण्याची औषधं. या पदार्थांचा अपघाताने किंवा मुद्दाम घेतल्यास जीवघेणा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रसंगी वेळीच दिलेला प्राथमिक उपचार (First Aid) जीव वाचवू शकतो.

आपल्या आजूबाजूच्या अनेक बातम्यांमध्ये आपण ऐकतो की कुणीतरी विष घेतलं आणि योग्य उपचाराअभावी जीव गमवावा लागला. त्यामुळे जर कुणी विष घेतलं असेल, तर सर्वप्रथम काय करावं? कोणता उपाय तत्काळ करावा? हे माहित असणं आवश्यक आहे.

विष घेतल्यावर काय करावं?

विशेषतः ग्रामीण भागात चुकून विष पिण्याच्या घटना अधिक दिसून येतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नये, हे जरी खरं असलं तरी काही प्राथमिक उपाय तुम्ही करू शकता.

1. रुग्णाने जर अजून उलटी केली नसेल, तर त्याला थोडं पाणी घालून वाटलेली मोहरी खायला द्यावी. यामुळे शरीरात गेलेलं विष बाहेर पडण्यास मदत होऊ शकते.

2. जर मोहरी नसेल, तर एक ग्लास पाण्यात एक मूठ मीठ मिसळून रुग्णाला पाजावं. यामुळेही उलटी होण्याची शक्यता असते.

3. जर रुग्णाने स्वतःहून उलटी केली असेल, तर त्याचा तोंड स्वच्छ करावे आणि शक्य तितक्या लवकर जवळच्या रुग्णालयात घेऊन जावं.

सर्व विष सारखे नसतात

प्रत्येक विषाचा प्रभाव वेगळा असतो. काही विषं तत्काळ परिणाम करतात तर काहींचा परिणाम काही वेळानंतर दिसतो. उदाहरणार्थ –

1. झोपेच्या गोळ्या आणि काही टॅबलेट्स हळूहळू परिणाम करतात.

2. पण उंदीर मारण्याचे औषधं, फिनाईल, किंवा कापूरच्या गोळ्या अत्यंत घातक असतात आणि काही मिनिटांतच जीवघेण्या ठरू शकतात.

डॉक्टरांचे मत काय?

वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जबरदस्तीने उलटी करणे धोकादायक ठरू शकते. काही विषं अन्ननलिकेतून उलटी करताना अधिक नुकसान करतात. त्यामुळे उलटी करावी की नाही, हे डॉक्टर ठरवतात.

पुढच्यावेळी लक्षात ठेवावं अशा काही महत्त्वाच्या गोष्टी :

1. घाबरून न जाता शांत राहा. चुकीचा निर्णय रुग्णाच्या तब्येतीस अधिक घातक ठरू शकतो.

2. काही विष उलटी करताना अन्ननलिकेला अधिक इजा करतात. त्यामुळे जबरदस्तीने उलटी करू देऊ नका.

3. औषधं, कीटकनाशकं यांना लहान मुलांच्या, वृद्धांच्या आवाक्याबाहेर ठेवा. त्यावर लेबल लावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.