AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter Health Tips: थंड पाणी वा गर्म पाणी? हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे कितपत योग्य? तज्ज्ञाचा सल्ला काय?

Winter Health Tips: हिवाळ्यात तर अनेकांना सकाळी सकाळी पाण्यात हात टाकावा वाटत नाही. कारण आता गच्चीवर पाण्याच्या टाक्या असतात. हिवाळ्यात यातील पाणी अत्यंत थंड असते. अशावेळी थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य की गरम पाण्याने अंघोळ करणे फायद्याचे आहे, जाणून घ्या?

Winter Health Tips: थंड पाणी वा गर्म पाणी? हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे कितपत योग्य? तज्ज्ञाचा सल्ला काय?
थंड की गरम, कोणत्या पाण्याने करावी अंघोळ?
| Updated on: Nov 27, 2025 | 4:23 PM
Share

Winter Health Tips: थंडीचा कडाका येत्या काही दिवसातच सुरू होईल. थंडीच्या कडाक्यात सकाळी अंघोळ करणे म्हणजे युद्धावर जाण्यासारखं अनेकांना वाटतं. हिवाळ्यात सकाळी पाण्यात हात टाकावा वाटत नाही. कारण अनेकांच्या पाण्याच्या टाक्या या गच्चीवर असतात आणि हिवाळ्यात यातील पाणी अत्यंत थंड होते. मग अशावेळी हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे की गरम पाण्याने अंघोळ करणे फायद्याचे आहे, असा प्रश्न अनेकांना सतावतो. कारण हिवाळ्यात जर थंड पाण्याने अंघोळ केली तर आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. तज्ज्ञांचा काय आहे सल्ला?

थंडीत गरम पाण्याने अंघोळ

थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याचे सूख काही औरच असते. गरम पाण्याने अंघोळ केल्याने काही काळ थंडी दूर होते. शरिरातील स्नायूंना आराम पडतो. रक्त प्रवाह सुधारतो. एकदम फ्रेश वाटल्यासारखं वाटतं. गरम पाण्याच्या वाफेमुळे नाक मोकळं होतं. तर या गरम पाण्याच्या गुळण्या केल्या तर घसाही साफ होतो. त्यामुळे हिवाळ्यात अगोदर गरम पाण्याने अंघोळ करण्याचा अनेकांचा आग्रह असतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक रिसर्च अँड इंजिनिअरिंग डेव्हलपमेंटच्या एका अहवालानुसार, अत्यंत उष्ण पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होते. कोरडेपणा, शुष्कपणा वाढतो आणि मग त्वचेची आग होते. खाज सुटते.

थंड पाण्याने अंघोळ

थंडीच्या दिवसात थंड पाण्याने अंघोळीचा विचारच अंगावर काटा आणतो. पण थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीर सक्रिय होते. रक्ताभिसरण वाढते. यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. कारण पांढऱ्या पेशी लवकर सक्रिय होतात. पण हिवाळ्यात अति थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला धक्का बसतो. यामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. यामुळे रक्तदाब वाढतो. हृदयाची गती वाढते. एकदम थंड पाण्याने अंघोळ करणे टाळणेच योग्य असते. काटमोड पाण्याने अंघोळ करणे चांगले आहे. अथवा अंघोळीपूर्वी जर तुम्ही व्यायाम करत असाल तर शरीर गरम होते आणि त्यात घरातील साध्या पाण्याने अंघोळ केल्यास तितका त्रास होत नाही. काहींना थंड पाण्याने अंघोळ केल्यास सर्दी-ताप असा त्रास होऊ शकतो.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम पाण्याने असा जर मनात संभ्रम असेल तर तो लागलीच दूर करा. कारण तज्ज्ञांच्या मते व्यावहारीक ज्ञानाला अधिक महत्त्व असते. जर बाहेर एकदम थंडगार वातावरण असेल आणि छतावरील अति थंड पाण्याने तुम्ही अंघोळ करत असाल तर मग हा शहाणपणा ठरत नाही. अशावेळी हट्ट न करता कोमट अथवा काटामोड गरम पाण्याने अंघोळ करणे चांगले राहते. यामुळे त्वचाही नरम राहते. तसेच सर्दी-पडसं, पायात गोळे येणे अथवा इतर आजार उद्धभवत नाहीत.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है