AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्लरसारखा हेअर स्पा होईल तेही घरच्या घरी, फक्त स्वयंपाकघरातील ‘या’ 3 गोष्टीने बनवा नॅच्युरल मास्क

आपले केस निरोगी आणि मऊ ठेवण्यासाठी हेअर स्पा हा सर्वोत्तम उपाय आहे. मात्र पार्लरला जायला वेळ मिळत नाहीये, तर चिंता करू नका आजच्या लेखात आपण अगदी पार्लर सारखा तेही घरातील 3 गोष्टींनी हेअर स्पा कसा करायचा ते जाणून घेणार आहोत.

पार्लरसारखा हेअर स्पा होईल तेही घरच्या घरी, फक्त स्वयंपाकघरातील 'या' 3 गोष्टीने बनवा नॅच्युरल मास्क
hair spa
| Edited By: | Updated on: Apr 28, 2026 | 3:44 PM
Share

आजकाल आपण प्रत्येक ऋतूत केसांची योग्य काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो. कारण बदलत्या वातावरणाचा परिणाम हा आरोग्यासोबत केसांवरही होतोच हे आपल्या सर्वांना माहितच आहे. त्यामुळे अनेकजण केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पार्लरमध्ये जाणून वेगवेगळे ट्रिटमेंट अवलंब करत असतात. तर यामध्ये हेअर स्पा करण्याला अधिक प्राधान्य दिले जात आहे. कारण प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि धूळ यांचा केसांवर परिणाम होत आहे. त्यामुळे, केसांची चमक टिकवून ठेवण्यासाठी हेअर स्पाचा मोठ्या प्रमाणात केला जातो. जे केसांना खोलवर पोषण देतात आणि त्यांना रेशमासारखे मुलायम बनवतात.

तथापि प्रत्येक महिलेला पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करायाा जमतो असे नाही. याशिवाय पार्लरमध्ये हेअर स्पा करताना वापरल्या जाणाऱ्या प्रोडक्टमध्ये केमिकलचा वापर जास्त होतो. ज्यामुळे कालांतराने केसांचे नुकसानही होऊ शकते.

पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काही सोप्या आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्याच्या मदतीने घरीच हेअर स्पासारखे अप्रतिम परिणाम मिळवू शकता. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला महागड्या प्रोडक्टची गरज भासणार नाही, तर स्वयंपाकघरातील काही वस्तू लागतील.चला तर मग घरी हेअर स्पा कसा करायचा आणि त्यासाठी कोणते साहित्य लागेल हे जाणून घेऊयात.

घरीच हेअर स्पा करा

घरीच हेअर स्पा करणे खूप सोपे आहे. यासाठी महागड्या साहित्याची किंवा उपकरणांची आवश्यकता नसते. तुम्हाला फक्त काही साहित्य एकत्र करून हेअर मास्क तयार करायचा आहे आणि तो तुमच्या केसांना लावायचा आहे. चला तर मग, हेअर मास्कसाठी कोणते साहित्य लागते ते जाणून घेऊयात.

स्पासाठी केसांचा मास्क कसा बनवायचा?

रेशमी आणि मुलायम केसांसाठी स्वयंपाकघरात उपलब्ध असलेली कॉफी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात कॅफीन असते, जे नैसर्गिकरित्या केसांना मऊ आणि मुलायम बनवते. केसांच्या वाढीसाठीही ते फायदेशीर मानले जाते. मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या कॉफीमध्ये काही घटक मिक्स करावे लागतील. यासाठी तुम्हाला तांदळाचे पीठ, ऑलिव्ह तेल आणि कोरफडीचा गर लागेल.

केसांचा मास्क कसा बनवायचा?

हेअर मास्क बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे कॉफी पावडर टाका. पाणी उकळल्यावर गॅस बंद करा आणि ते थोडे थंड होऊ द्या. नंतर त्यात 1 चमचा तांदळाचे पीठ आणि 1 चमचा ऑलिव्ह तेल टाका. त्यानंतर मिश्रणात कोरफडीचा गर टाकून चांगले मिक्स करा. हा मास्क तुमच्या संपूर्ण केसांना व्यवस्थित लावा आणि रुंद दातांच्या कंगव्याने केस विंचरा. 15 ते 20 मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर एक टॉवेल गरम करून तो केसांभोवती गुंडाळा. 5 ते 6 मिनिटांनी टॉवेल काढून केस धुवा. तुम्हाला लगेच फरक दिसून येईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?
भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...
Bhiwandi | भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...अनर्थ टाळण्यासाठी मोठी तारांबळ!