AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Lok sabha result 2019 : अमरावती लोकसभा मतदारसंघ निकाल

अमरावती लोकसभा मतदारसंघ : अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्यात 18 एप्रिलला मतदान पार पडले होते. अमरावतीत 63.8 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 2014 मध्ये येथे 62 % मतदान झाले होते. मतदानाचा टक्का एका टक्क्याने […]

Amravati Lok sabha result 2019 : अमरावती लोकसभा मतदारसंघ निकाल
अमरावती : नवनीत कौर राणा
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

अमरावती लोकसभा मतदारसंघ : अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्यात 18 एप्रिलला मतदान पार पडले होते. अमरावतीत 63.8 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 2014 मध्ये येथे 62 % मतदान झाले होते. मतदानाचा टक्का एका टक्क्याने वाढल्याने निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली. अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ तर काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा यांच्यात प्रमुख लढत झाली. मात्र  अखेर नवनीत राणा यांनीच बाजी मारली.

अमरावती लोकसभा मतदारसंघ निकाल

पक्षउमेदवारनिकाल
अपक्ष/इतरगुणवंत देवपारे (VBA)पराभूत
भाजप/शिवसेनाआनंदराव अडसूळ (शिवसेना)पराभूत
काँग्रेस/ राष्ट्रवादीनवनीत कौर राणा विजयी

अमरावती लोकसभामध्ये  1951 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून अमरावती लोकसभा मतदारसंघावर 1991 पर्यंत भारताच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील निवडून येईपर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता.

नंतर 1996 मध्ये शिवसेनेचे उमेदवार अंनत गुडे,  1998 मध्ये काँग्रेस आणि रिपाईचे   उमेदवार  रा.  सु.  गवई निवडून आले होते. तर पुन्हा 1999 आणि 2004 मध्ये सेनेचे अंनत गुढे  निवडून आले होते. 2009 मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता राखीव झाल्यानंतर सुद्धा सेनेने आपले वर्चस्व कायम ठेवत आनंदराव अडसूळ दोन वेळा निवडून आले. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेची पकड पाहायला मिळाली.

यावेळी पुन्हा भाजप सेना युतीकडून आनंदराव अडसूळ, तर गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून रिंगणात असलेल्या नवनीत राणा या वेळी काँग्रेस राष्ट्रवादीकडून मैदानात होत्या.

अमरावती जिल्ह्यात शिक्षणाच्या चंगल्या सुविधा असल्या, तरी मेळघाट आदिवासी भागात आदिवासींना शिक्षणाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.  सेनेचे उमेदवार हे केवळ माझे विरोधक नाही तर जिल्ह्यच्या विकासाचे विरोधक आहे, असा प्रचार नवनीत राणा यांनी केला.

अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. इथे एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, आणि मेळघाट हे सहा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदार संघात येतात. अमरावती जिल्हयात एकूण 8 विधानसभा मतदार संघ असून यापैकी 6 विधानसभा मतदार संघ अनुक्रमे -बडनेरा, अमरावती,तिवसा,दर्यापूर, मेळघाट, अचलपूर हे विधानसभा मतदार संघ आहे.

आदिवासींना कोरडवाहू शेती शिवाय रोजगाराचा कुठलाच पर्याय नाही. घरातील करते पुरुष आणि तरुण शेतीचा हंगाम संपला की रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेतात. आदिवासींच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात खासदार अडसूळ यांना यश आलेले नाही. अचलपूर, अंजनगाव, वरुड,  मोर्शी, या भागात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. मात्र संत्रावर प्रक्रिया करणारे कुठलेच उद्योग नाहीत. कोल्ड स्टोरेज नाहीत, किंवा आपला संत्रा विदेशात थेट विकण्याची व्यवस्था नाही. त्यामुळं शेतकरी वर्ग विद्यमान खासदार तथा सेनेचे उमेवार आनंदराव अडसूळ यांच्यावर नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.