Raigad Lok sabha result 2019 : रायगड लोकसभा मतदारसंघ निकाल

रायगड : कोकणातील सर्वात रंगतदार राजकीय निवडणूक असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी विजय मिळवला.  2014 प्रमाणे यावेळीही शिवसेनेचे अनंत गिते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यात मुख्य लढत आहे. या दुहेरी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता राज्यभरात होती. राज्यातील टॉप टेन लढती पैकी एक महाराष्ट्रातील राजकीयदृष्या दिग्गज राजकीय नेत्यांपैकी एक म्हणून रायगड लोकसभा …

Raigad Lok sabha result 2019 : रायगड लोकसभा मतदारसंघ निकाल

रायगड : कोकणातील सर्वात रंगतदार राजकीय निवडणूक असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी विजय मिळवला.  2014 प्रमाणे यावेळीही शिवसेनेचे अनंत गिते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यात मुख्य लढत आहे. या दुहेरी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता राज्यभरात होती.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाअनंत गीते (शिवसेना)पराभूत
काँग्रेस/ राष्ट्रवादीसुनिल तटकरे (राष्ट्रवादी)विजयी
अपक्ष/इतरसुमन कोळी (VBA)पराभूत

राज्यातील टॉप टेन लढती पैकी एक

महाराष्ट्रातील राजकीयदृष्या दिग्गज राजकीय नेत्यांपैकी एक म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघातील लढत मानली गेली. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील तटकेर यांचा निसटता पराभव झाला होता. केवळ दोन हजार मतांनी पराभव झालेल्या रायगड लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे निवडणुकीसाठी पुन्हा आमने सामने आले.

मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत रायगड लोकसभा निवडणुकीत पावणेतीन टक्यांनी मतदानाची आकडेवारी घटली.

रायगड मतदारसंघात ८ लाख ९ हजार ३४३ पुरुष मतदार आहेत, त्यापैकी ५ लाख ४ हजार ९९८ जणांनी मतदान केले (६२.४०%). तर ८ लाख ४२ हजार २१४ महिला मतदारांपैकी ५ लाख १५ हजार १८७ म्हणजे ६१.१७ टक्के महिलांनी मतदान केले. एकूण मतदार १६,५१,५५७ पैकी १०,२०,१८५ मतदारांनी मतदान केले.

विधानसभानिहाय 2014 आणि 2019 ची मतदानाची आकडेवारी  

रायगड लोकसभा मतदारसंघ

विधानसभा            2014 मतदान%             2019 मधील मतदान %

पेण                                ६५.७७                          ६५.१७

अलिबाग                       ६७.९०                            ६४.८९

श्रीवर्धन                          ६४.२०                            ५९.९९

महाड                            ६२.०३                            ५९.३९.

दापोली                          ६२.००                            ६१.५६

गुहागर                        ६४.१४                             ५९.१९

रायगड लोकसभा मतदार संघातून 16 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ईव्हीएम मशीनवर एका मतपत्रिकेवर 16 उमेदवार बसत होते. मात्र नोटा याठीचा पर्याय यावेळी दुसऱ्या मतपत्रिकेवर देण्यात आला होता. त्यामुळे नोटाचा वापर जास्त होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी गेल्या वेळची निवडणूक सुनील तटकरे यांना निसटता पराभव देऊन गेली. त्यामुळे कमी मतदानाचा फायदा कुणाला होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण शिवसेनेचे अनंत गिते आणि राष्ट्रवादीचे तटकरे यांच्यात ही निवडणूक सुद्धा घासून असेल असे राजकीय विश्लेषक यापूर्वीपासूनच सांगत आले आहेत.

रायगड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार इथं प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले होते. तर शेवटच्या टप्यात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील सभा घेतली होती. शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही इथे सभा घेतली. विकास हा मुद्दा सोडून इथली निवडणूकसुद्धा आरोप प्रत्यारोपांवर रंगली गेली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *