AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडेच्या वैद्यनाथ साखर कारखान्यात चोरी, 4 संशयीत ताब्यात

पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरी झाली आहे. परळी पोलिसांनी या प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

पंकजा मुंडेच्या वैद्यनाथ साखर कारखान्यात चोरी, 4 संशयीत ताब्यात
sagar joshi
sagar joshi | Updated on: Dec 24, 2020 | 8:31 AM
Share

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरी झाली आहे. चोरट्यांनी कारखान्याच्या स्टोअर गोडाऊन आणि वर्कशॉपमधून तब्बल 37 लाख 84 हजारांचं साहित्य लंपास केल्याची तक्रार परळी ग्रामिण पोलिसांत 22 डिसेंबर रोजी देण्यात आली होती. त्यानंतर परळी पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला. या चोरी प्रकरणात अखेर परळी पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. (4 suspects arrested in Vaidyanath sugar factory theft case)

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोअर गोडाऊन आणि एक वर्कशॉप गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये 17 ऑक्टोबर 2020 ला चोरी झाली. त्याची माहिती स्टोअर किपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक आणि लीगल इन्चार्ज जमीन शेख यांना कळवण्यात आली. त्यानंतर लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचं शटर उचकटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र, याबाबत कारखाना प्रशासनाकडून 22 डिसेंबरला तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

कारखान्यातील किती आणि कोणते सामान चोरीला?

चोरीच्या या घटनेत एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य लंपास करण्यात आलं आहे. त्यात कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. या प्रकरणात 22 डिसेंबर रोजी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा तपासाला सुरुवात केली. त्यानंतर अखेर पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.

पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत

विधानसभा निवडणुकीत आपले बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणातून बाहेर फेकल्या गेल्याचं चित्र निर्माण झालं होतं. कोरोना काळात त्या मुंबईतच असल्यामुळे त्यांना बीड जिल्ह्यात फक्त फोनवरुनच कामं करावी लागत होती. त्यानंतर अखेर पंकजा मुंडे यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. 26 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय मंत्रीपदी निवड करण्यात आली. आपल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत पंकजा यांनी पक्षनेत्यांचे त्याचबरोबर असंख्य कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. माझ्यावर टाकलेली राष्ट्रीय मंत्रीपदाची जबाबदारी मोठी आहे. या जबाबदारीला न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करेन, असं त्या म्हणाल्या.

भाजप कार्यकारिणीत महाराष्ट्रातून कुणाला स्थान?

पंकजा मुंडे (राष्ट्रीय मंत्री) विनोद तावडे (राष्ट्रीय मंत्री) विजया राहटकर (राष्ट्रीय मंत्री) सुनिल देवधर (राष्ट्रीय मंत्री) व्ही. सतीश (राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री) जमाल सिद्धिकी (अल्पसंख्यक मोर्चा) हिना गावित (राष्ट्रीय प्रवक्ता) संजू वर्मा (राष्ट्रीय प्रवक्ता)

संबंधित बातम्या:

पंकजा मुंडे यांच्या कारखान्यात चोरी! किती लाखाचं साहित्य लंपास?

एकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही

4 suspects arrested in Vaidyanath sugar factory theft case

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला