साता-यात साई बाबांची 105 फुटांची मुर्ती; पाहायला लोकांची गर्दी

साता-यात साई बाबांची 105 फुटांची मुर्ती; पाहायला लोकांची गर्दी
सातारा हायवेलगत असलेली साईबाबांची मुर्ती

आमच्या वडिलांची प्रचंड इच्छा होती, की साता-यात असं श्रध्देचं स्थान असावं. त्यावर मी काही वर्षे विचार करून हा निर्णय घेतल्याचे मुर्ती स्थापना करणा-यांनी सांगितले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: ओमकार बलेकर

Jan 17, 2022 | 8:47 PM

सातारा – पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात निसर्गाची  (nature) देणगी थो़डीसी वेगळी आहे, असं म्हणावं लागेल कारण प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही प्रवास करीत असताना तुमचं मन मोहून घेण्या-या अनेक गोष्टी तुम्हाला दिसतात. यात सातारकरांनी (satara) आणखी भर टाकली आहे. 105 फुट उंच असणारी साई बाबांची (sai baba) मुर्ती बसवण्यात आली आहे. ही मुर्ती एका साई भक्ताने आपल्या वडिलांच्या स्मृतिपितर्थ्य दिली असून मुर्तीच्या खालच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत वृध्दाश्रम सुरू करण्यात येणार आहे.

साई बाबांची मुर्ती सातार-यातील एका मुलाने वडिलांच्या इच्छेखातर वाई तालुक्यात बसवली असून ती बरोबर हायवेलगत असल्याने अनेक प्रवाशांचे मन मोहून घेत असल्याची चर्चा संपुर्ण सातारा जिल्ह्यात आहे. तसेच मुर्तीच्या उंचीचा विचार केल्यास 105 फुट उंची असल्याने अनेक प्रवासी तिथं थांबून दर्शन सुध्दा घेत आहेत.

आमच्या वडिलांची प्रचंड इच्छा होती, की साता-यात असं श्रध्देचं स्थान असावं. त्यावर मी काही वर्षे विचार करून हा निर्णय घेतल्याचे मुर्ती स्थापना करणा-यांनी सांगितले.

मुंबई-पुणे-सातारा-कराड-बंगलोर-कोल्हापूर-कोकण या ठिकाणी पर्यटनासाठी जाणा-या लोकांचे मन वेधून घेणारी मुर्ती असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. तसेच असं श्रध्दास्थान प्रत्येक ठिकाणी असावं अशी भावना पर्यटकांनी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे व्यक्त केली आहे.

Pimpri Chinchwad crime| कुठला डॉन? आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील302 म्हणत अल्पवयीन तरुणीची सोशल मीडियावर गुंडगिरी

मेट्रोच्या ट्रायलसाठी शरद पवार कशासाठी? मेट्रो कंपनीवर हक्कभंग आणणार, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा इशारा

Pimpri Chinchwad cyber crime| पुण्यात उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत लाखांना गंडवले

 


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें