कोरोनानंतर औरंगाबादमध्ये पहिल्या हेरिटेज वॉकचे आयोजन, तज्ज्ञांनी उलगडला समृद्ध दौलताबादचा इतिहास

हेरीटेज वॉक या उपक्रमाद्वारे औरंगाबादमधील ऐतिहासिक स्थळांना भेट देत, तेथील माहिती तज्ज्ञांच्या मार्फत दिली जाते. कोरोनाकाळात बंद झालेला हा उपक्रम 21 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा सुरु झाला. दौलताबाद किल्ल्यापासून उपक्रमाला सुरुवात झाली.

कोरोनानंतर औरंगाबादमध्ये पहिल्या हेरिटेज वॉकचे आयोजन,  तज्ज्ञांनी उलगडला समृद्ध दौलताबादचा इतिहास
दौलताबाद किल्ल्यात आज हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं.
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 5:25 PM

औरंगाबाद : दौलताबाद (Daulatabad Fort) अर्थात देवगिरी हे शहर मध्ययुगीन कालखंडातील सर्वात समृद्ध शहरांपैकी एक होते. समकालीन प्रवाश्यांच्या लिखाणातून हे स्पष्ट होते. तत्कालीन कालखंडात बगदाद हे सर्वात सुंदर शहर मानणारे प्रवासी दौलताबादला आल्यावर याच्या प्रेमात पडले, अशी माहिती इतिहासकार डॉ. दुलारी कुरेशी (Dulari Kureshi) यांनी आज दौलताबाद किल्ल्यात उपस्थित मंडळींना दिली. अमेझिंग औरंगाबाद आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण औरंगाबाद विभाग कार्यालयातर्फे आयोजित या वॉकमध्ये शहरातील बालवृद्धांनी सहभाग नोंदवला.

जागतिक वारसा सप्ताह निमित्ताने दौलताबाद येथे दिनांक रविवार (21 नोव्हेंबर) रोजी हेरीटेज वाँक आयोजित करण्यात आला होता. सकाळी आठ वाजता सुरू झालेला हा वॉक दुपारी एकच्या सुमारास संपला. यावेळी डॉ. रफत कुरेशी यांनी मोहम्मद बिन तुघलग आणि अन्य मध्ययुगीन राजशाह्यांच्या बाबत माहिती सांगितली. या किल्ल्यालगत असलेल्या तीन तटबंदी, त्याची निर्मिती आणि उपयोग विशद करून सांगितला. यानंतर श्रीकांत उमरीकर यांनी छोट्या गावामध्ये विखुरलेल्या प्राचीन मूर्ती, मंदिरे, बारवा यांच्या जतन व संरक्षणासाठी चळवळीस सहकार्य करण्याचे आव्हान केले.

हेमाडपंथी मंदिर कला, संगीत हे दौलताबादची देण

यादवांचे प्रधान म्हणून प्रसिद्ध असलेले हेमाद्री यांच्या नावे हेमाडपंथी मंदिरे आहेत. विशिष्ट प्रकारच्या या मंदिराची माहिती यावेळी देण्यात आली. मंदिरांवर कलाकुसर आणि दगडांचा विशिष्ट पद्धतीने झालेला वापर हा या मंदिरांचे वैशिष्ट्य होय. गोपाल नायक, शारंगदेव यांच्यासारखे संगीत क्षेत्रातील महारथी देवगिरी किल्ल्याने देशाला दिलेली देण आहेत. तत्कालीन मोठे कलाकार अमीर खुसरोदेखील गोपाल नायकाच्या सतत सात तास गायनावर भाळले होते, असे डॉ. दुलारी कुरेशी यांनी सांगितले.

उर्दू, मराठी भाषा मूळ दक्खनची

उर्दू ही भाषा उत्तर भारतातील आहे असा समज आहे. मात्र दौलताबाद आणि त्याचा परिसर हा उर्दू भाषेचा जनक आहे असा दावा डॉ. कुरेशी यांनी केला. दौलताबादेत जगभरातील विविध भाषा बोलणारी मंडळी मुक्कामी असे. त्यांच्या माध्यमातून जी भाषा निर्माण झाली ती उर्दू होय. हीच भाषा कालांतराने उत्तरेत गेली आणि तिथे मात्र ती अधिक सुधारित झाली. मराठी देखील दौलताबादच्या या परिसरात मोटजी झाली, असे त्या म्हणाल्या.

ऐतिहासिक स्थळे आपला वारसा: चावले

पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक पुरातत्वविद डॉ. मिलनकुमार चावले यांनी उपस्थित स्वागत करून पुरातत्व चालु असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. ही वारसास्थळे ही भावी पिढीसाठी जपली पाहिजेत. 204 एकर परिसरात विस्तारलेला दौलताबाद किल्ला राखण्यासाठी केवळ 40 माणसे आहेत, त्यामुळे त्यांना खराब करू नका, असे आवाहन डॉ. मिलन कुमार चावले यांनी आज केले. श्रीकांत उमरीकर यांनी दुर्लक्षित वारसा जतन करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे असे सांगितले.

नर्मदेपासूनचा प्रदेश दौलताबादचा संरक्षक: वाघमारे

पत्रकार आदित्य वाघमारे यांनी संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याचे भौगोलिक महत्त्व विशद केली. दौलताबाद किल्ल्याचे संरक्षक हे केवळ आज दिसणारे खंदक अंधारी नव्हेत. दक्खन आणि दौलताबाद किल्ल्याकडे येताना नर्मदा आणि तापी सारख्या मोठ्या नद्या ओलांडाव्या लागतात. त्यानंतरचा किल्ल्यापर्यंतचा असलेला प्रदेश फारसा सपाट नसल्याने वाट बिकटच होती. मेंढा तोफ देशातील दुसरी सर्वात मोठी तोफ असल्याचे ते म्हणाले.

इतर बातम्या-

कोरोना गांभीर्यानं घ्या, राज्यात 5 लाख लग्न, उपमुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन, पारनेरमधील कार्यक्रमात वक्तव्य

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी, विनोद तावडेंवर नवीन जबाबदारी, जे. पी. नड्डांकडून नियुक्ती

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.