AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST workers : हट्ट करणाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल. संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परबांचा इशारा

हट्ट करून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल असा इशारा त्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून देण्यात आलाय. एसटी डबघाईला आली आहे, तिला खाईत लोटू नका असंही परिवहन मंत्री म्हणालेत.

ST workers : हट्ट करणाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल. संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परबांचा इशारा
अनिल परब, एसटी कर्मचारी आंदोलन
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 12:31 PM
Share

मुंबई : संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी गंभीर इशारा दिला आहे. काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत तर काही एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. त्यामुळे हट्ट करून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल असा इशारा त्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून देण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातले एसटी कर्मचारी राज्यव्यापी संपावर होते. हा संप 15 दिवस चालल्यानंतर राज्य सरकारनं ऐतिकासिक 41 टक्के पगारवाढ जाहीर केली. आणि संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं.

परिवहन मंत्री अनिल परब काय म्हणाले?

  1. पगारवाढीचा प्रस्ताव कामगारांच्या हीतासाठीच
  2. 12 ते 13 हजार कर्मचारी कामावर परतले
  3. कोरोनामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिकट
  4.  लोकांना वेठीस धरू नका, लोक दुसऱ्या पर्यायाकडे वळत आहेत
  5. तंटपुंडे पगार असणाऱ्यांचे पगार वाढवले
  6. दर महिन्याला 10 तारखेच्या आधी पगाराची हमी
  7. विलीनीकरणाबाबत समितीचा अहवाल मान्य करणार
  8. बाकीच्या राज्यांच्या बरोबरीनं एसटी कर्मचाऱ्यांना पगार
  9. काही कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम
  10. हट्ट करून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

परबांच्या आवाहनला सकारात्मक प्रतिसाद मिळणार?

एसटी डबघाईला आली आहे, तिला खाईत लोटू नका असंही परिवहन मंत्री म्हणालेत. आम्ही गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, गुणरत्न सदावर्ते या सर्वांशी चर्चा केली आहे, मात्र सदावर्ते विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांनी कोर्टात लढावं, आमचं काही म्हणणं नाही असंही परब म्हणालेत. न्यायलयीन प्रक्रियेचा वेळ सदावर्ते कमी करु शकतात का? असा सवालही परबांनी केलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी हट्ट न करता कामावर हजर व्हावं असं आवाहन अनिल परबांनी केलंय. त्यामुळे आता परबांच्या आवाहनाला एसटी कर्मचारी किती प्रतिसाद देतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Narendra Modi: भ्रष्टाचारात सजा झाली तरी सगळीकडे उदोउदो कसा? गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते मोदींच्या टार्गेटवर

Constitution Day: … तर संविधानाचं एक पानही आज आपण लिहू शकलो असतो का?: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Gold Price: सोने स्वस्त! आज सर्वात मोठा खरेदी योग, वाचा औरंगाबादचे भाव!

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.