आज डिनर कुठे आणि कुणासोबत? दिशा पटाणीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे लाजले

आज 13 जूनला आदित्य ठाकरे आणि दिशा पटाणी या दोघांचाही जन्मदिवस आहे. हे दोघे मित्र एकाच दिवशी जन्मदिन साजरा करत आहेत. आदित्य ठाकरेंचा हा 29 वा तर दिशा पटाणीचा हा 26 वा जन्मदिवस आहे.

आज डिनर कुठे आणि कुणासोबत? दिशा पटाणीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे लाजले
Follow us
| Updated on: Jun 13, 2019 | 12:57 PM

मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी हे नुकतेच एका डिनर डेटमुळे चर्चेत आले होते. यावेळी आदित्य आणि दिशा जुहूच्या एका हॉटेलमधून एकत्र बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानंतर आज 13 जूनला आदित्य आणि दिशा या दोघांचाही जन्मदिवस आहे. हे दोघे मित्र एकाच दिवशी जन्मदिवस साजरा करत आहेत. आदित्य ठाकरेंचा हा 29 वा तर दिशा पटाणीचा हा 26 वा जन्मदिवस आहे.

आदित्य ठाकरे यांनी काल (12 जून) उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी 10 वीच्या विद्यार्थांच्या समस्या आणि दुष्काळ या समस्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. त्याबाबत सांगण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचं कारण आणि झालेली चर्चा याविषयी सांगितलं. यानंतर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना काही असे प्रश्न विचारले ज्यामुळे आदित्य ठाकरे यांनी अक्षरश: लाजून पत्रकारासमोर हात जोडले.

जन्मदिवसाला खास व्यक्तीकडून खास शुभेच्छा आणि गिफ्ट आलं का, असा प्रश्न पत्रकाराने विचारला. तेव्हा आदित्य ठाकरे लाजले आणि त्यांनी हसून पत्रकारांसमोर हात जोडले. तसेच, सकाळपासूनच अनेकांच्या शुभेच्छा येत आहेत. मी रात्री सर्वांना रिप्लाय देईल असेही आदित्य म्हणाले.

आजचा डिनर ‘मातोश्री’वर करणार की बाहेर, यावर आदित्य यांनी पुन्हा लाजत उत्तर दिले. डिनर ‘मातोश्री’वरच करणार असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दिशा पटाणी ही आदित्य ठाकरे यांच्यासोबत डिनरला गेली होती. हे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर या दोघांनाही ट्रोल करण्यात आलं. खरं तर दिशा पटाणीचं नाव कायमच अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत जोडलं गेलं. मात्र, या दोघांनी कधीच त्यांच्यातील नात्याला दुजोरा दिला नाही. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंसोबत डिनरला गेल्याने दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आदित्य ठाकरे सध्या राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. युवासेनेचे प्रमुख या नात्याने त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरे सुरु केले आहेत. शिवसेनेच्या दैनंदिन कामात, निर्णय प्रक्रियेत आदित्य ठाकरे सहभागी होत असतात.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.