आफ्रिकन स्वाईन फिव्हरमुळे या जिल्ह्यात घबराट, पशुसंवर्धन विभागाची मोठी कारवाई
राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता-साकुरी परिसरातील डुक्करांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर या डुक्करांना आफ्रिकन स्वाईन फिव्हर झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर – राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता परिसरातील डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फिव्हर हा आजार आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. राहाता आणि साकुरी गावच्या एक किलोमीटर परिघातील डुकरांना पकडून त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. डुकरांमध्ये होणाऱ्या आजाराचा संसर्ग इतर प्राण्यांना आणि मनु्ष्याला नसला तरी डुक्कराचे मांस खाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हा आजार डुक्करांमध्ये झपाट्याने फैलावत असल्याने डुक्कर पालन करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. या आजाराची लागण डुक्करांना वेगाने होत असते. त्यामुळे हा आजार आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून विशेष मोहिम सुरू केली आहे. डूक्कराना शास्त्रीय पद्धतीने ठार करून त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची काही गरज नसली तर डुक्कराचे मांस शक्यतो टाळावे असा सल्ला देण्यात येत आहे. डॉ. सुशिल कोळपे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
राहाता तालुक्यात 15 दिवसांपूर्वी काही डुकरांचा अचानक मृत्यु झाला. त्यामुळे या डुक्करांचे सँपल भोपाळच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर आफ्रिकन स्वाइन फिवरने डुकरांचा मृत्यू होत असल्याचे आले समोर आहे.आत्तापर्यंत 16 डुक्करांना नियमावलीचे पालन करून केले ठार करण्यात आले आहे.
स्वाइन फ्लू आणि स्वाइन फिव्हर फरक काय ?
स्वाइन फिव्हर आणि स्वाइन फ्लू यात नाव साधर्म्य असले तरी दोन्ही वेगळे आजार आहेत. स्वाइन फिव्हर हा डुक्करांमध्ये होणारा आजार आहे. त्याचे माणसात संक्रमण होत नाही.आजारी डुकरांचे मांस खाणे टाळावे अशा सर्वसामान्यांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत. स्वाइन फ्लूप्रमाणे हा स्वाइन फिव्हर आजार माणसात पसरत नाही, तो केवळ डुक्करांनाच लक्ष्य करतो अशी माहिती डॉ.सुशिल कोळपे यांनी दिली आहे.
साकुरी गावातही आफ्रिकन स्वाइन फ्लू.
राहाता तालुक्यातील साकुरी गावातही डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लू आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झाले असून डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. साकुरी गावात गेल्या काही दिवसांपासून डुकरांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडत आहेत. अहिल्यानगरच्या पशु वैद्यकीय पथकाने साकुरीसह जिल्ह्यातील इतर काही गावांमधील डुकरांचे नमुने मध्यप्रदेशच्या भोपाळ येथील लॅबला तपासणीसाठी पाठवले होते.
डुकरांचे अनैसर्गिक मृत्यू आढळ्यास, कळवा !
साकुरी गावातील डुकरांचे सॅम्पल पॉझिटिव्ह आले असून त्यांना आफ्रिकन स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झालं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झाले असून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या आजाराचा मानवी आरोग्यास धोका नसला तरी साकुरी परिसरातील इतर गावांमध्ये डुकरांचे अनैसर्गिक मृत्यू आढळ्यास पशु वैद्यकीय पथकास संपर्क करावा असे आवाहन पशू शल्यचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त मुकुंद राजळे यांनी केले आहे.
