AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kunal Kamra : शिवसैनिक खवळले, रात्री स्टुडिओ फोडला, कुणाल कामराला आज 11 वाजता चोपण्याची धमकी

Kunal Kamra : खवळलेल्या शिवसैनिकांनी द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेलमध्ये तोडफोड केली. या हॉटेलमध्ये कुणाल कामराचा स्टुडिओ होता. शिंदेंच्या शिवसैनिकांनी जे हॉटेल फोडलं, त्यात आता पुन्हा स्टँडअप कॉमेडी होणार नाही. कुणाल कामराने रचलेल्या गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले.

Kunal Kamra :  शिवसैनिक खवळले, रात्री स्टुडिओ फोडला,  कुणाल कामराला आज 11 वाजता चोपण्याची धमकी
kunal kamra
| Updated on: Mar 24, 2025 | 7:50 AM
Share

शिवसेना नेता संजय निरुपम यांनी कॉमेडियन कुणाल कामराला धमकी दिली आहे. आज सकाळी 11 वाजता कुणाल कामराला चोपणार असा इशारा निरुपम यांनी टि्वटमधून दिला आहे. संजय निरुपम हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गाण्यातून आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. संजय निरुपम यांनी मारहाण करण्यासंबंधीच हे टि्वट रविवारी केलं. कुणाल कामरा हा स्टँअप कॉमेडियन आहे. त्याने एका गाण्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटलं.

एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह गाण्यानंतर खवळलेल्या शिवसैनिकांनी द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेलमध्ये तोडफोड केली. या हॉटेलमध्ये कुणाल कामराचा स्टुडिओ होता. शिंदेंच्या शिवसैनिकांनी जे हॉटेल फोडलं, त्यात आता पुन्हा स्टँडअप कॉमेडी होणार नाही. रात्रीच शो चे बॅनरही हटवण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनपर गाणे कॉमेडियन कुणाल कामरा याने रचले होते.

हॉटेलमध्ये घुसून  स्टुडिओ फोडला

त्यानंतर राहुल कनाल यांच्यासह शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी ‘द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेल’मध्ये घुसत स्टुडिओची तोडफोड केली. याप्रकरणी शिंदेच्या शिवसैनिकांवर गुन्हा देखील दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हॉटेलची तोडफोड याअगोदर देखील अनेकदा झाली आहे, त्यामुळे असे शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती.

कोणाला अटक झाली?

या तोडफोडी प्रकरणी शिवसेना नेते कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुणाल कामराच्या स्टुडिओमध्ये तोडफोड केल्यानंतर कुणाल सरमळकरला पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले आहे. कुणाल सरमळकरला खार पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

कुणाल कामराच्या या गाण्यावरुन महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिंदे यांची शिवसेना पूर्णपणे आक्रमक झाली आहे. संजय निरुपम यांनी कुणाल कामराला चोपण्याची धमकी दिली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना या गाण्यावरुन कुणालच कौतुक करताना शिंदे गटाला डिवचत आहे. संजय राऊत यांनी कुणालच हे गाण टि्वट करत ‘कुणाल का कमाल!’ जय महाराष्ट्र! असं टि्वट केलं आहे.

कुणाल कामराने गाण्यात काय म्हटलय?

कुणाल कामराने एका कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल भाष्य केलं. यावेळी त्याने एकनाथ शिंदे यांनी पक्षात राहून जे बंड केलेलं, त्याचा उल्लेख केला. “आधी शिवेसना भाजपमधून बाहेर आली. मग, शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. एनसीपी एनसीपीमधून बाहेर पडली. एका मतदाराला 9 बटणं दिली, त्यात सगळे कन्फ्यूज झाले” असं त्याने म्हटलं.

कुणाल कामराने गाण अशा पद्धतीने लिहिलय की, यात एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यात आलय. एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधणारे आक्षेपार्ह शब्द आहेत. त्यांना गद्दार म्हटलय. यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेत.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.