AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहेरी विधानसभा निवडणूक निकाल 2024: ‘बाप बाप होता है…’ विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर विरोधात लढणाऱ्या मुलीला बापाने सुनावले

Aheri Election Result 2024 LIVE Updates: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धर्मराव आत्राम यांचा एकतर्फी विजय झाला. त्यानंतर मोठा जल्लोष आत्राम व त्यांच्या समर्थकांनी केला. निकाल जाहीर झाल्यानंतर धर्मराव आत्राम हे जल्लोषात डान्स करत होते.

अहेरी विधानसभा निवडणूक निकाल 2024: 'बाप बाप होता है...' विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर विरोधात लढणाऱ्या मुलीला बापाने सुनावले
धर्मराव बाबा आत्राम भाग्यश्री आत्राम
| Updated on: Nov 24, 2024 | 11:50 AM
Share

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात नणंद भावजय यांच्यात सामना पाहायला मिळाला होता. विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये काका विरोधात पुतण्या लढत झाली. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदार संघात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी आणि शिवसेना उमेदवार संजना जाधव आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत झाली. या सर्व नात्यांमधील चर्चेच्या विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघातील लढत चर्चेत होती. या ठिकाणी बाप विरुद्ध बेटी अशी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गटात गेलेले मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम रिंगणात होती. या लढतीत धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय झाला. त्यानंतर बाप बाप होता है…अशी प्रतिक्रिया धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केली.

धर्मराव आत्राम यांच्याकडून जल्लोष

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धर्मराव आत्राम यांचा एकतर्फी विजय झाला. त्यानंतर मोठा जल्लोष आत्राम व त्यांच्या समर्थकांनी केला. निकाल जाहीर झाल्यानंतर धर्मराव आत्राम हे जल्लोषात डान्स करत होते. त्यांनी पहिली प्रतिक्रिया टीव्ही ९ मराठीला दिली. ते म्हणाले, बाप बाप होता है…माझा विजय माझ्या निश्चित होता, अशी प्रतिक्रिया आत्राम यांनी दिली.

असा आला निकाल

2019च्या विधानसभा निवडणुकीत अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम विजयी झाले होते. त्यांना 60 हजार 13 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे अंबरीशराव राजे अत्राम यांचा पराभव केला होता. आता त्यांना 53978 मते मिळाली. त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना 35569 मते मिळाली. अपक्ष उमेदवार राजे अंबरीश यांनी 37121 मते घेतली.

दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकाच कुटुंबातील असणाऱ्या या लढतीत प्रचार दरम्यान अनेक नाट्य झाली होती. धर्मराबाबा यांनी मुलीवर अनेक आरोपही केले होते.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.