AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेळ आली की मी सगळं सांगेल… निलेश लंके यांच्या विधानाने अहमदनगरमध्ये चर्चांना उधाण

Nilesh Lanke on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक, उमेदवारी अन् मतदारसंघातील प्रश्न, यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके काय म्हणाले? लंके यांनी स्थानिकांशी संवाद साधताना काय म्हटलं? कोणतं आश्वासन दिलं? वाचा सविस्तर......

वेळ आली की मी सगळं सांगेल... निलेश लंके यांच्या विधानाने अहमदनगरमध्ये चर्चांना उधाण
निलेश लंके
Updated on: Apr 01, 2024 | 3:41 PM
Share

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते निलेश लंके निवडणूक लढत आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यानंतर निलेश लंके यांनी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा काढली आहे. जनसंवाद साधण्यासाठी लंके यांनी ही यात्रा सुरु केली आहे. या यात्रेदरम्यान लंके यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपल्याकडे काही सीनियर लोक आहेत. मात्र चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे. सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. वेळ आली की, मी सगळं सांगेल, असं निलेश लंके म्हणाले.

“मी खासदार होणारच”

लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी स्वाभिमानी जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. शुभ कार्य करायचं म्हणलं की देवदर्शन केलंच पाहिजे.त्यामुळे मोहटा देवीला नतमस्तक होऊन आज यात्रेला सुरवात करत आहे. राजकारण ही विचारांची लढाई आहे. ती विचारांनीच लढली पाहिजे. एखादा कार्यकर्ता विरोधात गेला की त्याची चौकशी लावा. गुन्हे दाखल करा. व्यक्तिगत चौकशी लावली. असले प्रकार वाढले आहेत. सर्वसामान्य माणूस पुढे आले की त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण जनतेची ताकद माझ्या पाठीमागे आहे. लोकांच्या पाठिंब्याने मी खासदार होणारच, असा विश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे.

विखेंवर टीका

आपला नगर दक्षिण 75 टक्के दुष्काळी भाग आहे. मी बोलतो ते करतो. मात्र अनेकजण दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करता… मी निवडून आल्यावर प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभारणार आहे. त्यांनी अनेक आश्वासन दिली मात्र ते पुन्हा पहिलाच मिळाले नाही. साखळीई योजना आणली नाही. ताजनापूर पाणी योजना आणतो म्हणाले मात्र आणली नाही. पाथर्डी-नगर महामार्ग मी उपोषणाला बसलो, तेव्हा पूर्ण झाला. मात्र ते हेलिकॉप्टरमध्ये फिरत होते, असं म्हणत निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे.

तुम्हाला संसदेत नेणार- लंके

माझ्या उमेदवारीचा सर्वात जास्त आनंद शिवसैनिकांना झाला आहे. नगर दक्षिणच्या जास्तीच जास्त गावात जाऊन आडीअडचण समजून घेणार आहे. आता हा रथ दिल्लीलाच जाऊनच थांबणार आहे. हा जगनाथचा रथ आहे. अनेक जण पाच वर्ष फिरत नाही तर साखर-गुळ वाटायला येतात. तुम्हाला कुणी संसदमध्ये नेलं नाही. मात्र मी तुम्हाला सर्वांना घेऊन जाईल. विधानसभेत देखील मी चार पाचशे लोक नेत असतो. यांनी फक्त त्रास देण्याचं काम केलं. अनेकांचे कामे अडवली, असा टोला निलेश लंके यांनी सुजय विखे यांना लगावला आहे.

अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो
अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो.
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे.
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार.
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप.
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली.
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल.
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका.
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा.
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा.
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा.