AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Radhakrishana Vikhe Patil : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुप्रीम धक्का; त्यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Radhakrishna Vikhe Patil FIR : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी निःपक्ष व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी तक्रारकर्ते बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी केली आहे.

Radhakrishana Vikhe Patil : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुप्रीम धक्का; त्यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Apr 30, 2025 | 2:14 PM
Share

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.. मंत्री विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विखे पाटलांच्या अधिपत्याखालील प्रवरा साखर कारखान्यात शेतकर्‍यांच्या नावे 9 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. .प्रकरणाची चौकशी निःपक्ष व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी तक्रारकर्ते बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी केली आहे.

काय आहे हे प्रकरण?

2004 – 2005 आणि 2007 साली बेसल डोसचे पैसे वाटप करावयाचे कारण देत राष्ट्रीयकृत बँकेतून जवळपास 9 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. मात्र ते पैसे शेतकर्‍यांना न देता त्याचा गैरवापर करण्यात आला आणि कर्जमाफीत हे कर्ज माफ करून घेत फसवणूक केल्या प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक, साखर आयुक्त, बँकांचे अधिकारी अशा 54 जणांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कारखान्याचे सभासद बाळासाहेब केरूनाथ विखे यांनी या प्रकरणी सर्वोच न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लोणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विखेंचा राजीनामा घ्यावा

तपासी अधिकार्‍यांनी आठ आठवड्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र आरोपींविरुद्ध लगेचच कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असे निर्देशही न्यायालयाने दिलेले आहेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी निःपक्ष व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी तक्रारकर्ते बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी केली आहे.. दरम्यान मंत्री विखे पाटलांसह 54 जणांवर गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली असून विखे पाटलांच्या अडचणी वाढल्या आहेत.. चौकशी अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागल आहे.  तर राज्य सरकार या प्रकरणात आता कोणती कारवाई करते आणि काय भूमिका घेते याविषयीची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी