
कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी रोहित पवार यांनी नेटा लावला आहे. आता या एमआयडीसीवरुन रान पेटले आहे. अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या एमआयडीसीसाठी परिसरातील १२०० एकर जागा संपादित करण्यात येणार आहे. त्यात काही बागायती क्षेत्राचा आणि उपजाऊ जमीनाचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला. या एमआयडीसीचा काही मोजक्याच उद्योजकांना त्याचा फायदा होणार आहे. तर मुळ लोकांच्या तोंडाला पानं पुसली जाणार असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
नीरव मोदींशी काय संबंध?
MIDC शीसाठी स्थानिकांकडून कवडी मोल भावाने जमीन खरेदी करण्यात येणार आहे. त्यात नीरव मोदींची जमीन आहे. त्याचे चार-चार क्षेत्र आहे. काही धनाढ्यांना फायदा होण्यासाठी एकाच खास क्षेत्रातील जमीन एमआयडीसीसाठी संपादित करण्याची मागणी करण्यात येत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. नीरव मोदीला पैसे मिळावे म्हणून रोहित पवारला निवडून दिले का असा सवाल उमेश पाटील यांनी केला आहे. रोहित पवार फ्रॉड असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे
पाटेगाव आणि खंडाळा इथे ही एमआयडीसी व्हावी यासाठी आग्रह करत आहे. खंडाळा गावात बहुतेक खरेदी या २०२२ च्या आहेत. काही त्याच त्याच लोकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. ठरावीत लोकांनी जागा खरेदी केल्या आहे. हे सगळे शेतकरी आहेत का? हे कोणाचे मित्र आहेत. हे कोण व्यवसायिक मित्र आहेत. अस सवाल त्यांनी केला. रोहित पवार यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा आरोप उमेश पाटील यांनी केला.
या प्रकरणाची चौकशी करा
एमआयडीसी झालीच पाहीजे. एमआयडीसी कुठेही झाली तरी रोजगार मिळणार आहे. मुळ शेतकरी नसलेल्या लोकांना फायदा होता कामा नये. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री यांनी चौकशी करावी अशी आपण मागणी केल्याचे पाटील यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी याप्रकरणात स्वत:हून जातीने लक्ष घातले असे ते म्हणाले.