Sahar Sheikh: हिरव्या रंगावर राजकारण… AIMIM नगरसेविकेचे ‘ते’ फोटो चर्चेत, म्हणाल्या, ‘कोणता रंग…’
AIMIM Mumbra Sahar Sheikh: एआयएमआयएम पक्षाच्या तरुण नगरसेविका सहर शेख गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता देखील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय कॅप्शनने देखील सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

AIMIM Mumbra Sahar Sheikh: एआयएमआयएम पक्षाच्या तरुण नगरसेविका सहर शेख यांच्या एका वक्तव्यामुळे देशात राजकारण तापलं आहे. हिरव्या रंगावर वादग्रस्त वक्तव्य केलेल्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आता इन्स्टाग्रामवर सहर यांचे काही फोटो व्हायरल होत आहे. खुद्द सहर यांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत सहर यांनी कॅप्शनमध्ये ‘कलर… कलर… कोणता रंग?’ असं लिहिलं आहे. एवढंच नाही तर, पुढे सहर यांनी, ? कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन का कुछ पता नहीं.” असं लिहिलं आहे. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सहर शेख काय म्हणालेल्या?
एआयएमआयएम पक्षाच्या तरुण नगरसेविका सहर शेख यांनी निवडणूक जिंकल्यानंतर भाषण केलं होतं. ‘संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगणार…’ असं सहर म्हणालेल्या. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यावर राजकीय वर्तुळात देखील संतापाची लाट उसळली. या विधानाबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षावर टीका केली. भाजप, विश्व हिंदू परिषदेसह इतर संघटनांनीही सहर शेख यांच्या विधानाचा निषेध केला.
View this post on Instagram
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दाखल केली तक्रार
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सहर शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावर कारवाई करत, पोलिसांनी देखील सहर यांनी नोटिस बजावण्यात आली. त्यानंतर आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सहर यांनी माफी मागितली. ‘माझं वक्तव्य फक्त माझ्या पक्षाच्या झेंड्यांच्या रंगासाठी होतं…’
भाजप नेते किरीट सोमय्या ट्विट करत म्हणाले, ‘मुंबईतील मुंब्रा येथील एआयएमआयएम नेत्या सहर शेख यांनी ‘आम्ही मुंब्रा हिरवं करू’ या त्यांच्या विधानाबद्दल माफी मागितली आहे.’ माफीनाम्यात सहर म्हणाल्या, ‘माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगतो आणि मरतो. पण, जर विधानामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे लेखी माफी मागितली आहे.’
सहर यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी देखील निषेध केला.
उद्धव ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी सहर शेख यांच्या विधानावरून वारिस पठाण आणि इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आणि म्हणाले, ‘या हिरव्या सापांचा चिरडून टाकेल… यांचे विचार मुळीच सहन करणार नाही…’
