Sanjay Raut : तुम्ही तर चोरांचे सरदार – संजय राऊत कोणावर संतापले ?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात ते एका पोलिस अधिकाऱ्यांना फोनवर धमकावत असल्याचे दिसून येते. या व्हिडिओवरून संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून त्यांनी पवार आणि शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. राऊत यांनी अजित पवार यांच्यावर आयपीएस अधिकाऱ्यांना दबाव आणण्याचा आरोप केला आहे आणि त्यांनी या सरकारला "चोरांचे राज्य" असे संबोधले आहे. हा वाद आता राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ते एका फोन कॉलवर पोलीस अधिकारी महिलेला झापत होते, मुरूम उपशावर सूरु असलेली कारवाई रोखण्याचे आदेश देतानाचा दादांचा व्हिडीओ समोर आला असून त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या महिला अधिकाऱ्याने ओळख पटवण्यासाठी व्हिडीओ कॉलचा पर्याय सुचवल्यावर अजित पवार भडकले. तुम्ही मला कॉल करायला सांगताय ? तुमच्यावर अॅक्शन घेईन अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. याच मुद्यावर आता वातावरण पेटलं असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून थेट सुनावलं आहे. शिंदे, अजित पवार यांच्याकडचे माणसं चोर डाकू स्मगलर बलात्कारी आहेत अशी टीका करत त्यांनी महायुतीच्या मंत्र्यांवर निशाणा साधला.
काय म्हणाले राऊत ?
शिंदे, अजित पवार यांच्याकडचे माणसं चोर डाकू स्मगलर बलात्कारी आहेत. त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठीच या नेत्यांना सत्ता हवी आहे. सुनिल शेळकेचं प्रकरण मी काढलं, तिथे बेकायदेशीर खाणकाम सुरू होतं. त्यांचाच आमादरा सुनिल शेलके, त्याने सरकारला कोट्यावधींचा चुनाव लावला. आणि अजित पवार त्यांना संरक्षण देतात, असे असंख्य लोकं आहेत. खुद्द मोदींनी अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला. आणि आता ते (पवरा) आयपीएस अधिकाऱ्याला दम देतात, ते फार शिस्तबद्ध आहेत ना?
मी बेशिस्त खपवून घेणार नाही असं ते म्हणतात, मग आता काय झालं ? एका आयपीएस अधिकाऱ्याला तुम्ही दम देता, तेही तुमच्या पक्षातील चोरांना संरक्षण देण्यासाठी ? मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचा डिसिप्लिन ? असा खड़ा सवाल राऊत यांनी विचारला.
Ajit Pawar : तुझी इतकी हिंमत, मी अॅक्शन घेईन… महिला अधिकाऱ्यावर अजित पवार भडकले, VIDEO व्हायरल
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला
डिसिप्लिन, शिस्त कोणासाठी मग ? बेकायदेशीर मुरमाचं प्रकरण म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं अशी टीका केली. हे प्रकरण समोर आल्यावर अजित पवारांना नैतिकदृष्ट्या सराकरमध्ये राहण्याचा अधिकारच नाही. या आधी नैतिकतेच्या मुद्यावर अनेकांना राजीनामे द्यावे लागले आहेत. या राज्याचा उपमुख्यमंत्री असलेला माणूस आयपीएस अधिकाऱ्याला बेकायेदशीर कामांना पाठिंबा द्या म्हणून सांगतोय, मी सांगतोय ते बेकायदेशीर काम कर असे ते सांगताहेत. आणि हेच अजित पवार इतरांना कायदा शिकवात, मग तुम्ही काय करता ? असा सवाल उपस्थित करत तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात अशी तोप राऊत यांनी डागली. तुम्ही महाराष्ट्र राज्य हे चोरांचं राज्य केलं आहे, महाराष्ट्राच्या उत्तम प्रशासनाला तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावताय . त्यांना लाज वाटली पाहिजे अशा प्रकारचे फोन करताना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला असा घणाघात राऊतांनी केला.
