मोठी बातमी! पार्थ पवार जमीन घोटाळा आरोप प्रकरणात अजितदादांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा, आता नवं ट्विस्ट
पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली असून, अजित पवार यांनी मोठा दावा केला आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून, विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. आपला या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचं सुरुवातीलाच अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान त्यांनी आता या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटी रुपये किंमतीची जमीन 300 कोटीमध्ये खरेदी केल्याचा आरोप होत आहे, तसेच या व्यवहारात नियमानुसार 6 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित असताना केवळ 500 रुपयेच भरल्याचं देखील समोर आलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही, मला या व्यवहाराबद्दल काहीही माहिती नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना या व्यवहारामध्ये एकही रुपया आतापर्यंत कोणालाही देण्यात आलेला नाही, असा मोठा दावा अजित पवार यांनी केला आहे. या प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत, सर्व दस्त देखील रद्द करण्यात आले आहेत, तसेच चौकशीसाठी समिती देखील गठीत करण्यात आली आहे, महिनाभरात या प्रकरणातील अहवाल सादर करण्याच्या सूचना या समितीला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं की, माझ्या नावाचा वापर केला तर ते मला चालणार नाही, कोणही असो, अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये, अशा सूचनाही यावेळी अजित पवार यांनी दिल्या आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील तब्बल 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात होत आहे, तसेच नियमानुसा मुद्रांक शुल्क 6 कोटी रुपये होत असताना केवळ 500 रुपये इतकेच भरले गेल्याचा आरोप देखील होत आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत, दरम्यान आता हा संपूर्ण व्यवहारच रद्द करण्यात आला आहे.
