राष्ट्रवादीचीही ‘तीच’ भूमिका, धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवारांचं भाष्य

मलिक यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाची असल्याचंही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय. (Ajit Pawar Dhananjay Munde)

राष्ट्रवादीचीही 'तीच' भूमिका,  धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवारांचं भाष्य
अजित पवार आणि धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 1:48 PM

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा अरोप झाल्यानंतर राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका होत असून त्यांच्या राजीनाम्यची मागणी विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी “धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर यापूर्वीच खुलासा केला आहे. तसेच, राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष नवाब मलिक यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे,” असं म्हटलंय. तसेच, मलिक यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाची असल्याचंही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय.(Ajit Pawar given statement on Dhananjay Munde rape allegations)

“मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर त्यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिलंय. प्रांताध्यक्ष नवाब मलिक यांनीही भूमिका मांडली आहे. या प्रकरणावर मी काही बोलणार नाही. मलिकांनी भूमिका मांडली तीच भूमिका राष्ट्रवादी पक्षाची आहे,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

बलात्काराचा आरोप करणारी महिला डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला रेणू शर्मा यांनी यापूर्वी पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या महिलेने पुन्हा डीएन नगर पोलीस ठाण्याला आज (14 जानेवारी) भेट दिली आहे. या ठिकाणी त्यांनी सहायक पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिलीये. बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी यापूर्वी वर्सोवा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.

धनंजय मुंडे शरद पवार भेट

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप  झाल्यानंतर त्यांनी बुधवारी (13 जानेवारी) सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यासमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडल्याचे समजते. तत्पूर्वी बुधवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या भेटीलाही गेले होते. त्यामुळे आता नेमके काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

संबंधित बातम्या :

“कटुतेवर मात करत…” बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांचे आणखी एक ट्विट

धनंजय मुंडेंची चौकशी व्हायला हवी, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे; निलेश राणेंची आग्रही मागणी

धनंजय मुंडे प्रकरणात मी काही बोलणार नाही; जावयाच्या गुन्ह्याची शिक्षा सासऱ्याला का: जयंत पाटील

(Ajit Pawar given statement on Dhananjay Munde rape allegations)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.