“कटुतेवर मात करत…” बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांचे आणखी एक ट्विट

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते धनंजय मुंडेंनी ट्विटरच्या माध्यमातून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Dhananjay Munde tweets after alleged Rape Case)

"कटुतेवर मात करत..." बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांचे आणखी एक ट्विट

मुंबई : बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची प्रचंड कोंडी होताना दिसत आहे. फेसबुकवर दिलेले स्पष्टीकरण वगळता धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. अशातच धनंजय मुंडेंनी ट्विटरच्या माध्यमातून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Dhananjay Munde tweets after alleged Rape Case)

“कटुतेवर मात करत जीवनात गोडवा आणणारा आनंददायी सण म्हणजे मकर संक्रांत! मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तीळ गुळ घ्या आणि गोड बोला.” असं लिहित धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर तीळगुळाची इमेज शेअर केली आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ‘धनूभाऊं’च्या आयुष्यात आलेली कटुता दूर व्हावी, अशी आशा त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.

मुंबईच्या मलबार हिल येथील चित्रकूट बंगल्यावर येताना गुरुवारी पहाटेही धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना खबर लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून चित्रकूट बंगल्यावर आले. या गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे आत नेमके कोण बसले आहे, याचा अंदाज पटकन येणे शक्य नव्हते. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा ताफा नव्हता. ते एकटेच चित्रकूट बंगल्यावर आले होते.

बलात्काराच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे सध्या प्रचंड अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहणे तेवढेच महत्वाचे आहे. (Dhananjay Munde tweets after alleged Rape Case)

अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे शरद पवार यांच्या भेटीला

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला आहे. विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी बुधवारी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यासमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडल्याचे समजते. तत्पूर्वी बुधवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या भेटीलाही गेले होते. त्यामुळे आता नेमके काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

संबंधित बातम्या:

धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?

(Dhananjay Munde tweets after alleged Rape Case)

Published On - 11:54 am, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI