AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या भावाला रक्ताचा कर्करोग, भावासाठी 12 वर्षांचा मुलगा पुढे आला अन्… पाहा काय घडले?

अकोल्यातील 16 वर्षीय मुलाला रक्ताचा कर्करोग झाल्याने बोन मॅरो प्रत्यारोपण आवश्यक होते. उपचाराचा 25 लाखांचा खर्च गरीब कुटुंबाला परवडणारा नव्हता. पण, 12 वर्षांच्या धाकट्या भावाने स्टेम सेल्स दान करून मोठ्या भावाचे प्राण वाचवले.

मोठ्या भावाला रक्ताचा कर्करोग, भावासाठी 12 वर्षांचा मुलगा पुढे आला अन्... पाहा काय घडले?
फोटो प्रातनिधिक
| Updated on: Oct 16, 2025 | 12:38 PM
Share

रक्ताच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या 16 वर्षीय मोठ्या भावाला 12 वर्षांच्या चिमुकल्या भावाने स्टेम सेल्स दान करून नवजीवन दिले आहे. विशेष म्हणजे, गरीब कुटुंबाला न परवडणाऱ्या 25 लाख रुपयांच्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि अन्य संस्थांनी देवदूतासारखी मदत केल्यामुळे हे प्रत्यारोपण यशस्वी झाले. यामुळे कुटुंबियांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत.

नेमके प्रकरण काय?

अकोला येथील जीवन (नाव बदलले आहे) नावाचा 16 वर्षांचा मुलगा रक्ताच्या कर्करोगाने (Blood Cancer) त्रस्त होता. वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. सततच्या आजारामुळे जीवनला एका मोठ्या खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे त्याला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. यानंतर तातडीने बोन मॅरो प्रत्यारोपण (Bone Marrow Transplant) करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

या उपचारासाठी सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. जो या कुटुंबाला पेलणारा नव्हता. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत घेण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला.

मुख्यमंत्री निधी कक्षाचा पुढाकार

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, जीवनच्या पालकांनी त्वरीत मुंबई गाठली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याशी संपर्क साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, रामेश्वर नाईक यांनी तातडीने कार्यवाही केली आणि मुंबईतील जसलोक रुग्णालयात जीवनच्या उपचारांची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून, टाटा ट्रस्ट आणि काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने उपचारासाठी लागणारे संपूर्ण 25 लाख रुपयांचे अर्थसहाय्य उभे करण्यात आले. यानंतर 4 सप्टेंबर 2025 रोजी जीवनच्या 12 वर्षीय लहान भावाने मोठ्या हिमतीने आपल्या मोठ्या भावाला अस्थिमज्जा (स्टेम सेल्स) दान केले. लहान भावाच्या या बलिदानामुळे आणि मुख्यमंत्री निधीच्या मदतीने जसलोक रुग्णालयात जीवनवर बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

‘हताश होऊ नका,’ कक्षाचे आवाहन

याबद्दल माहिती देताना कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जीवनप्रमाणेच अनेक गरीब व गरजू रुग्णांवर उपचार केले जात आहेत. दुर्धर आजार झाल्यास कोणीही हताश न होता 1800 123 2211 या टोल-फ्री क्रमांकावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.