Corona Positive | बापरे! कोरोना रुग्ण थेट रुग्णालयातून ग्रामपंचायतीत; सरपंचपदाच्या निवडणुकीत भाग

कोरोना पॉझिटीव्ह असतानाही जिल्हा प्रशासनाने त्यांना 11 फेब्रुवारीला कान्हेरी गवळी येथे होणाऱ्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकी करिता जाण्यासाठी परवानगी दिली

Corona Positive | बापरे! कोरोना रुग्ण थेट रुग्णालयातून ग्रामपंचायतीत; सरपंचपदाच्या निवडणुकीत भाग
Akola Grampanchayat Corona Positive Member

अकोला : जीएमसीमधून कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण थेट कान्हेरी गवळी येथील ग्रामपंचायतमध्ये (Akola Gram Panchayat Corona Positive Member) पोहोचल्याची घटना घडली आहे. कैलास पवार असं या ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे. कैलास पवार हे कान्हेरी गवळी येथील नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य आहेत. ते कोरोना पॉझिटीव्ह असतानाही जिल्हा प्रशासनाने त्यांना 11 फेब्रुवारीला कान्हेरी गवळी येथे होणाऱ्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकी करिता जाण्यासाठी परवानगी दिली (Akola Gram Panchayat Corona Positive Member).

कैलास पवार हे अकोला जीएमसी येथून अॅम्ब्युलन्सने थेट कान्हेरी गवळी येथील ग्रामपंचायतीत मतदानासाठी आपला हक्क बजावण्यासाठी पोहोचले. बाळापूर तालुक्यासह जिल्ह्यात या गोष्टीमुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.

जिल्हा प्रशासनाकडून पॉझिटीव्ह रुग्णाला मतदानाची परवानगी

एकीकडे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना सरकार उपाययोजना म्हणून शहरासह जिल्ह्यात कारवाईचा बडगा उचला आहे. तर दुसरीकडे, जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू म्हणतात की, कोरोना थांबविण्यासाठी पॉझिटीव्ह रुग्णांनी संपर्कात येवू नका घरात थांबा, आपल्याला यावर मात करायची आहे. त्यामुळे फक्त 15 दिवस काळजी घ्या आणि घरात थांबा. हे सांगत असतांना दुसरीकडे कोरोनाची भीती असतांना देखील जिल्हा प्रशासनाने पॉझिटीव्ह रुग्णाला मतदानाची परवानगी देऊन मोठी हिंमत नागरिकांना दाखवली आहे (Akola Gram Panchayat Corona Positive Member).

ग्रामपंच्यातमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड

काल बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी ग्रामपंच्यातमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड होती. त्यासाठी सदस्य हजर असणे आवश्यक असते. त्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णाला परवानगी दिली आणि हा रुग्ण मतदान कक्षेत सर्व सदस्यांसोबत एक तास हॉल मध्ये होता. हा सदस्य हॉलमध्ये तर एक तास होताच, पण गावात 2 तासांच्यावर होता. सर्वांसोबत मिसळत ही होता. तर, बऱ्याच जणांसोबत सेल्फीही काढली. या सदस्याला जिल्हा प्रशासनाला कशी परवानगी दिली, असा आरोप गावातील नागरिक करत आहेत.

Akola Gram Panchayat Corona Positive Member

संबंधित बातम्या :

अमरावतीत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच, गुरुदेवनगरमधील बाजारपेठ बंदचे आदेश

शंभूराज देसाईंच्या मेहनतीला यश, पाटण तालुक्यात 107 पैकी 68 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI