AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्व धारावीकर पात्र; केवळ कागदपत्रं न दिल्यास अपात्र ठरणार !

एसआरएच्या योजनांमध्ये, २०११ नंतर तळमजल्यावर स्थलांतरित झालेल्या किंवा वरच्या मजल्यांवरील झोपड्यांना थेट अपात्र ठरवून बेदखल केले जात असे. मात्र डीआरपी अंतर्गत, अशा सर्व रहिवाशांना देखील मुंबई महानगर प्रदेशातच आधुनिक, प्रशस्त आणि मोफत देखभाल असलेली गृहसंकुले दिली जाणार आहे, जिथे १० वर्षांपर्यंत देखभाल पूर्णपणे विनामूल्य असेल.

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्व धारावीकर पात्र; केवळ कागदपत्रं न दिल्यास अपात्र ठरणार !
| Updated on: Jul 02, 2025 | 9:02 PM
Share

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्प ( डीआरपी ) आणि महाराष्ट्र सरकार यांनी संयुक्तपणे मसुदा परिशिष्ट-II टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करणे सुरू केले आहे. धारावीतील नागरिक याकडे मोठ्या आशेने आणि उत्सुकतेने पाहत आहेत. सेक्टर – ६ ( मेघवाडी आणि गणेश नगर ) साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या यादीत ७५% हून अधिक झोपडपट्टीधारकांना नव्या घरांसाठी पात्र असल्याचे डीआरपीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. उर्वरित नागरिकांची पात्रता आवश्यक कागदपत्र आणि पडताळणीच्या आधारे निश्चित केली जाणार आहे.

एकूण ५०५ झोपड्यांपैकी ३१ झोपड्यांचे कोणतेही दस्तऐवज अद्याप सादर झालेले नाहीत, तर १३७ प्रकरणे ही मुंबई महापालिकेमार्फत पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. त्याचा डीआरपी पाठपुरावा करीत आहे. उर्वरित ३८ झोपड्या ही सुविधा (ऍमेनिटी ) स्वरूपातील रचना आहेत. शिल्लक २९९ झोपड्यांपैकी २२९ झोपड्या विविध निकषांनुसार पात्र ठरल्या असून, उर्वरित ७० झोपड्यांच्या पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

‘धारावी पुनर्विकास हा झोपडपट्टी पुनर्वसनाच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्व समावेशक प्रकल्प आहे. या प्रकल्पात प्रत्येक रहिवाशाला नियमांनुसार धारावीत किंवा धारावीच्या बाहेर घर मिळणारच आहे. एवढेच नाही, तर सर्व व्यावसायिक पात्र असोत की अपात्र, त्यांना व्यवसायाकरिता धारावीतच जागा दिली जाणार आहे असे डीआरपीचे मुख्यकार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी स्पष्ट आहे.

अपात्र व्यासायिकांसाठी योजना

श्रीनिवास पुढे म्हणाले की, ‘पात्र व्यवसायिकांना मोफत जागा मिळणारच आहे, पण त्याचवेळी अपात्र व्यावसायिक धारकांसाठी आम्ही सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. त्यांनाही धारावीतच भाडे तत्वावर व्यावसायिक जागा उपलब्ध करून द्याव्यात. प्रत्येक पुनर्विकास सोसायटीमध्ये राखीव असलेल्या १०% व्यावसायिक जागा अशा अपात्र व्यावसायिकांसाठी भाड्याने देण्यात याव्यात, जेणेकरून त्यांचे रोजगार सुरू राहतील.

परिशिष्ट-II च्या आकडेवारीनुसार, तळमजल्यावरील १७० झोपडीधारकांनी (यात निवासी, व्यावसायिक आणि मिश्र वापराच्या झोपड्यांचा समावेश आहे ) पात्रतेचे सर्व निकष पूर्ण केले आहेत., त्या धारावीमध्येच किंवा बाहेर नव्या घरांसाठी पात्र ठरल्या आहेत. यातील १५७ झोपड्या १ जानेवारी २००० पूर्वी उभारलेल्या असून, त्यांना धारावीत ३५० चौरस फूट क्षेत्रफळाचे नवीन घर मिळवण्यास पात्र ठरल्या आहेत. उर्वरित १३ झोपड्या “शुल्क पात्र ” प्रकारात मोडतात ज्यांचे धारावीत अस्तित्व १ जानेवारी २०११ पूर्वीचे आहे. त्यांना धारावीच्या बाहेर ३ लाखांपर्यंतच्या सवलतीच्या दरात ३०० चौरस फूट घर मिळणार आहे.

वरच्या मजल्यावरील झोपडीधारकांना काय ?

डीआरपी आणि विद्यमान सरकार यांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, इतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसह इतर योजनांमध्ये सहसा अपात्र ठरणाऱ्या वरच्या मजल्यावरील झोपडीधारकांना या प्रकल्पात प्रथमच समाविष्ट करण्यात आले आहे. डीआरपीच्या खास ‘हायर-पर्चेस’ योजनेअंतर्गत वरच्या मजल्यावरील ५९ झोपड्यांना नवीन घरांसाठी पात्र झाल्या आहेत. या नागरिकांना सुरुवातीला १२ वर्षे भाड्याने ३०० चौरस फूट घर मिळणार असून, त्यानंतर हे घर त्यांच्या नावावर कायमस्वरूपी हस्तांतरित होईल. इच्छुक लाभार्थ्यांना या १२ वर्षांच्या कालावधीत कोणत्याही वेळी ठराविक सरकारी दराने ते घर खरेदीही करता येईल.

हरकती आणि सूचना सादर कराव्यात

धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRP) कडून झोपडपट्टीधारकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी मसुदा परिशिष्ट-II संदर्भात आपल्या हरकती आणि सूचना सादर कराव्यात. या हरकती अथवा सूचना DRP कार्यालयात प्रत्यक्ष जमा करता येतील किंवा ई-मेलद्वारे :- dcca1drpsra@gmail.com या पत्त्यावर पाठवता येतील. हरकती/सूचना सादर करण्याची अंतिम मुदत ५ जुलै, संध्या. ५.३० वाजेपर्यंत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.