AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर महत्वाची बैठक, उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय..

ठाकरे गटातून मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदार आणि एका विधान परिषदेच्या आमदाराने पक्षातून बंड केली. आता नाशिक महापालिकेत मोठा दणका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे.

बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर महत्वाची बैठक, उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय..
Uddhav Thackeray
| Updated on: Jul 15, 2026 | 9:40 AM
Share

राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली. केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार येत्या दोन ते दिवसात होणार आहे. ठाकरे गटातून बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांपैकी कोणाची वर्णी लागणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यादरम्यानच काल रात्री उशिरा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल अचानक वर्षा बंगल्यावर पोहोचले. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. त्यामध्येच ठाकरे गटात मोठी बंडखोरी होताना दिसली. उद्धव ठाकरे स्वत: बंडखोरी रोखण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

नाशिक महापालिकेतील काही नगरसेवक बंडखोरीच्या तयारीत असल्याचे सांगितले जातंय. हे नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. नगरसेवक फुटीच्या चर्चेनंतर नाशिकमधील नगरसेवक आज ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत. त्यांची बैठक मातोश्रीवर आहे. सर्व नगरसेवक बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती मिळतंय.

नाशिकमधील नगरसेवकांना मुंबईत बोलावून पक्षशिस्तीचा आढावा घेत एकनिष्ठतेची खात्री केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या नगरसेवकांची बंडखोरी होऊ नये, याकरिता ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे. दहा ते बारा नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.

नाशिकमधील ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वात मुंबईकडे नगरसेवक रवाना झाले आहेत. स्वत: उद्धव ठाकरे यांच्याकडून नगरसेवकांची बैठक घेतली जाईल. राज्यातील काही वरिष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतंय. शिवसेना ठाकरे गटाला एका मागून एक मोठे धक्के बसताना दिसत आहेत. त्यामध्येच आता बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. तब्बल 6 खासदारांनी ठाकरे गटातून मोठी बंडखोरी केली. त्यानंतर सचिन आहिर यांनीही पक्षाला रामराम केला.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक