‘महाराजांच्या इतिहासाशी किती प्रतारणा करणार? तुमची मळमळ गेली नाही का?’; अमोल मिटकरी यांचा घरचा आहेर
"आपटेला अशा प्रकारचा पुतळा बनवून नक्की काय त्याला सांगायच होतं? महाराजाच्या इतिहासाशी किती प्रतारणा करणार आहात? अजून तुमची मळमळ का गेली नाही?", असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला.

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेलाय पुर्णाकृती पुतळा कोसळ्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. विशेष म्हणजे या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. “आपटे नावाच्या एका नासमज शिल्पकाराने महाराजांचे शिल्प रेखाटले. मालवण ला जो पुतळा उभारला त्यात महाराजांच्या डाव्या भुवयीच्या वर एक खोप दाखवली गेली आणि त्याचा संदर्भ सनातन प्रभातमध्ये मुलाखतमध्ये तो म्हणतो, १६५९ नंतरचे शिवाजी महाराज मला रेखाटायचे होते”, असं अमोल मिटकरी म्हणाले.
“१६५९ ला प्रतापगडाच्या माचीवर जो रणसंग्राम झाला तेव्हा ही खोप कोनाकडून आली याच उत्तर देत असताना म्हणे अफजल खानाने शिवाजी महाराजांवर हल्ला केला. मुळात इतिहासाची संदर्भ साधने सांगतात जेधे शेकावली, जेधेकरींना, शिवभारत आणि तात्कालीन शाहीर अज्ञानदास पोवाडा यामध्ये अफजल खानाचा वकील तुटुन पडला तेव्हा पट्याने वार केल्याचा उल्लेख आहे. वकील कृष्णा कुलकर्णी होता, महाराजांवर दगाफटका केला. त्यांना इजा झाली तो कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी केल्याचा आहे. आपटेला अशा प्रकारचा पुतळा बनवून नक्की काय त्याला सांगायच होतं? महाराजाच्या इतिहासाशी किती प्रतारणा करणार आहात? अजून तुमची मळमळ का गेली नाही?”, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला.
‘गृहमंत्र्यांनी त्यांना जेलबंद करावं’
“हा जगातला आणि देशातला पहिला पुतळा असेल जो पुतळा उभारला कंत्राट घेतलं, त्यावर खर्चही झाला. त्या माध्यमातून आपला छुपा अजेंडा चालविण्याच पाप आपटेने केलं आहे. आपटे सारख्या मिसरुड न फुटलेल्या, कुठलाही अनुभव नसलेल्या अक्कलशुन्य माणसावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन गृहमंत्र्यांनी त्यांना जेलबंद करावी, अशी महायुती सरकारला विनंती”, असं अमोल मिटकरी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस उद्या आंदोलन करणार
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते उद्या राज्यभरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मुक आंदोलन करणार आहेत. शिवाय पुन्हा त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य स्मारक करण्याची सरकारकडे मागणी करणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रक काढून कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत.
