Amravati Crime | धारणीत कौटुंबिक वाद विकोपाला, पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविले, अमरावती जिल्ह्यात चाललंय काय?

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला पेटविले. ती जळाली असल्यानं तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Amravati Crime | धारणीत कौटुंबिक वाद विकोपाला, पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविले, अमरावती जिल्ह्यात चाललंय काय?
नसीमाला पतीने पेटविल्यानंतर तिच्या प्रकृतीची चिंता करताना नातेवाईक.
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 10:02 AM

अमरावती : जिल्ह्यातील धारणी मुख्यालयापासून 32 किलोमीटर अंतरावर बैरागड आहे. बैरागड येथील निवासी नासीर शेख गफूर (वय 42) याचा पत्नीसोबत वाद झाला. कौटुंबिक हिंसेतून (domestic violence) त्याने आपल्या पत्नी नसीमा बानो (वय 36) हिच्या अंगावर रॉकेल टाकले. पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न (attempted arson) केला. असा गंभीर आरोप नसीमा बानोचे वडील शेख हफिज व आईने केला आहे. घटनेची माहिती धारणीत पसरतात संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पीडित नसीमा बानोच्या कुटुंबातील आई आणि वडिलांनी ही माहिती दिली. त्यानुसार, माहितीनुसार नसीमाचे पती नासीर शेख गफुर हे नेहमीच पत्नीबद्दल कुरकूर करत होते. वेगवेगळ्या कारणांना तिच्यासोबत भांडण करत. तिला मारहाण (assault) करत असतं. इतकेच नव्हे तर या भांडणांमध्ये नसीमाला नेहमीच सोडचिठ्ठी देण्याची धमकी देत होता. शिवाय जीवे मारण्याची धमकी सुद्धा देत होता.

नसीमा 83 टक्के जळाली

शनिवारी सकाळची घटना. नासीरची धमकी प्रत्यक्षात आली. रॉकेसलच्या भडक्यात नसीमा जवळपास 83 टक्के जळाली. आता तिची परीस्थिती नाजूक आहे. धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पीडित नसीमा बानोच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार नसीमाला पती नासीरसह तिच्या कुटुंबियांनी यासाठी मदत केली. तिचा देर सद्दाम, हुजेब, जाबीर, आफ्रोज यांनी मिळून रॉकेल टाकून टाळले. जळालेल्या अवस्थेमध्ये नसीमाला सर्वप्रथम बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले. पण, प्रकृती गंभीर असल्याने तिला तिथून धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

बैरागडच्या आरोग्य केंद्रात डॉक्टरांचे दुर्लक्ष

नसीमाच्या कुटुंबाने बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुद्धा गंभीर आरोप लावलेत. त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग्य उपचार केला नाही. उलट पाठीमागच्या दारातून नसीमाला धारणीत पाठविले. इतकेच नव्हे तर नसीमाच्या भावाचे कॉलर पकडले. दवाखान्याच्या बाहेर हाकलले. असा सुद्धा आरोप नसीमाच्या भावाने लावला आहे. धारणी पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. तपास पोलीस करीत आहेत.

Nagpur | तुमचा पाल्य वसतिगृहात शिकतो, काय आहेत नियम?; काय म्हणतात, समाज कल्याण आयुक्त जाणून घ्या

Nagpur Police | मालकाच्या नावाचा बनावट मेल; पैसे तिसऱ्याला पाठवायला सांगितले, फेक अकाउंट निघाल्याने अडचण

Nagpur Accident | टायर फुटल्याने कार डिव्हायडरवर धडकली; नागपुरातील कोंढाळीजवळ अपघात, तीन जण जागीच ठार

Non Stop LIVE Update
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.