AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Bhuyar : देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी, भुयार यांची फेसबुक पोस्ट तुम्ही पाहिली का ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) हे संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी देवेंद्र भुयार यांना घरचा रस्ता दाखवला आहे. गुरूवारी देवेंद्र भुयार यांच्यावर राजू शेट्टी यांनी टीकाही केली.

Devendra Bhuyar : देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी, भुयार यांची फेसबुक पोस्ट तुम्ही पाहिली का ?
मग मतं मागायला येऊ नका, आम्ही काय आमच्या वावरातल्या कामासाठी निधी मागतोय का? वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर संतापले अपक्ष आमदारImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 8:46 AM
Share

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) हे संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी देवेंद्र भुयार यांना घरचा रस्ता दाखवला आहे. गुरूवारी देवेंद्र भुयार यांच्यावर राजू शेट्टी यांनी टीकाही केली. ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला असे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना पक्षातून काढताच काही वेळातच देवेंद्र भुयार यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post) केली आहे. “धन्यवाद’ अशा आशयाचा मजकूर देवेंद्र भुयार यांनी फेसबुक पोस्ट मध्ये केला आहे. देवेंद्र भुयार यांनी धन्यवाद अशा आशयाचा स्टेटस अनेक सोशल मीडियावर ठेवला आहे. अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार हे संघटनेचं कुठल्याही कामात सहभागी होत नसल्याने त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे.

पक्षातील वरीष्ठ फळीत खटके उडत होते

विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत देवेंद्र भुयार यांचा विजय झाला. त्यांनी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे शेतकरी संघटनेचा एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले. त्यावेळी एका आमदाराला मंत्रीपद मिळावं यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी आग्रह धरल्याचा होता. देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यात आणि पक्षातील वरीष्ठ फळीत खटके उडत होते. आमदार झाल्यानंतर देवेंद्र भुयार यांनी इतर पक्षांशी आपले संबंध वाढवले. भुयार पक्षाला जुमानत नसल्याचे अनेकदा पक्षाच्या लक्षात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खिशाला बिल्ला सुध्दा लावत नसल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या कानावर घातले.पत्रकार परीषदेत विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा यांनी देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी केली. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मतभेद असल्याचे पहिल्यांदा चव्हाट्यावर आले.

पक्षातून हकालपट्टी करावी अशी कार्यकर्त्यांची मागणी

हिवरखेड येथे राजू शेट्टी यांची सभा होणार होती. त्यावेळी तिथे कार्यकर्त्यांनी देवेंद्र भुयार यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली होती. तसेच अनेक बॅनर पक्षातून हकालपट्टी करावी अशा आशयाचे होते. कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने राजू शेट्टी यांनी विचार करतो अशी त्यावेळी भूमिका घेतली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विविध आंदोलनात त्यांचा सहभाग नव्हता. सध्याच वीज बील, कर्जमाफी संदर्भात महाविकास आघाडी विरोधात आंदोलन सुरू केले असता आमदार भुयार कोणत्याही व्यासपीठावर न दिसल्याने त्यांची हकापट्टी करण्यात आली आहे.

Petrol, diesel prices : आज पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

Father Murder | मित्राच्या मदतीने बापाची हत्या, आईची पोलिसात तक्रार, बारा तासात दोघे गजाआड

भविष्यात पेट्रोल, डिझेल आणखी महागणार ; पेट्रोलियम कंपन्यांना तीन महिन्यात 19 हजार कोटी रुपयांचा तोटा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.