मोदींनी व्हाट्सअॅप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनू नये, काँग्रेसवरची टीका म्हणजे केविलवाणा प्रकार-यशोमती ठाकूर

पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन हीन दर्जाचे राजकारण करू नये. पंतप्रधान पदाची असलेली गरिमा राखावी अशोभनीय वर्तन करू नये अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी व्हाट्सअॅप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनू नये, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

मोदींनी व्हाट्सअॅप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनू नये, काँग्रेसवरची टीका म्हणजे केविलवाणा प्रकार-यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर यांची मोदींवर टीका
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 11:32 PM

अमरावती : गेल्या दोन दिवसांपासून मोदींनी (Pm Modi Speech) काँग्रेस (Congress) आणि राहुल गांधींना (Rahul Gandhi) टार्गेट केलंय. मोदींनी संसदेत बोलताना काँग्रेसचा गेल्या सत्तर वर्षांपासूनचा इतिहास काढला आहे. अगदी नेहरूंपासून सर्वांचा उल्लेख मोदींनी टीका करताना केला आहे. त्यावर काँग्रेस नेते भडकडून उठले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने गेल्या दोन दिवसंपासून बोलत आहेत, ते अत्यंत चुकीचे आणि असमर्थनीय आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन हीन दर्जाचे राजकारण करू नये. पंतप्रधान पदाची असलेली गरिमा राखावी अशोभनीय वर्तन करू नये अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी व्हाट्सअॅप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनू नये, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

मोदींनी इतिहास तपासावा-ठाकूर

गोवा मुक्तिसंग्राम मध्ये कोण लढलं आणि नेमका काय झालं याचा सर्व इतिहास उपलब्ध आहे. मोदींनी एकदा तपासून पाहावा आणि मगच बोलावे. कारण मोदीना केवळ संघाच्या शाखेत शिकवला जातो तितकाच इतिहास पंतप्रधान मोदींना माहिती आहे. एखाद्या व्यक्तीची अथवा राज्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी चुकीचा इतिहास रचून व्हाटसॲप युनिवर्सिटीचे कुलगुरू बनू नये, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. काँग्रेसने केलेल्या विकासाचे श्रेय काँग्रेसला न देता केवळ दूषणे देणे मोदी यांचं लक्षण झाले आहे. देशाचा जो काही विकास झाला तो गेल्या सात वर्षात आणि त्यापूर्वी 70 वर्षात काही झाले नाही असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी करत आहेत. असेही त्या म्हणाल्या आहेत.

मोदींनी नौटंकी करु नये-ठाकूर

मोदींना त्यांना आता जनतेसमोर जायला कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत. सत्ता हातातून जाईल, या भीतीने ते काहीही बरळत आहेत, अशी परखड प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. देशावर आलेल्या कोरोनाचे संकट काँग्रेसमुळे आलं आणि भाजपमुळे ते गेलं, असे हास्यास्पद वक्तव्य पंतप्रधानांसारख्या व्यक्तीने करू नयेत, हे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना कधीही स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी असले नौटंकी चाळे करावे लागले नाहीत, पंडीत नेहरू हे आंतरराष्ट्रीय नेतेच होते. त्यामुळे त्यांना आपल्या इमेजची चिंता किंवा इमेज बनवण्यासाठी आतासारखी नौटंकी कधी करावी लागली नाही. असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.

पंतप्रधान मोदींच्या 60 मिनिटांच्या भाषणात 50 मिनिटे काँग्रेसवरच टीका, खडसेंचा टोला; चंद्रकांत पाटलांनाही प्रत्युत्तर

किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणात आता दिल्लीचं लक्ष! CISF पथकाकडून पुणे पोलीस आयुक्तांची भेट; वेगळा गुन्हा दाखल होणार?

Video : ‘अजित पवारांनी आयुष्यभर जमिनी लाटण्याचं काम केलं’, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप, अजितदादा काय उत्तर देणार?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.