सारथीचा चौकशी अहवाल जाहीर करा अन्यथा आंदोलन करू, आबासाहेब पाटलांचा इशारा

ठाण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आबासाहेब पाटलांनी सरकारला एक प्रकारचा इशारा दिलाय. मराठा समाजाच्या युवकांचा सर्वांगीण विकासासाठी कौशल्य विकासासाठी सारथी सारखी संस्था उभा राहिली.

सारथीचा चौकशी अहवाल जाहीर करा अन्यथा आंदोलन करू, आबासाहेब पाटलांचा इशारा
Abasaheb Patil

ठाणेः छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी संस्था ही मराठ्यांचं आशास्थान आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सारथीच्या स्वायत्ततेला मान्यता देण्यात आली होती. पण या सारथी संस्थेतही प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचंही उघड झालंय. विशेष म्हणजे मराठा समाजाचे नेते आबासाहेब पाटील यांनी सारथीतील भ्रष्टाचार उघड करण्याची मागणी केलीय.

आबासाहेब पाटलांचा सरकारला एक प्रकारचा इशारा

ठाण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आबासाहेब पाटलांनी सरकारला एक प्रकारचा इशारा दिलाय. मराठा समाजाच्या युवकांचा सर्वांगीण विकासासाठी कौशल्य विकासासाठी सारथी सारखी संस्था उभा राहिली. सारथीचा काही लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर केला, भ्रष्टाचार केला. यानंतर सारथीची चौकशी करण्यात आली, असंही ते म्हणालेत.

चौकशी अहवाल सरकारने जाहीर करावा

आता चौकशी पूर्ण झालेली असून, हा चौकशी अहवाल सरकारने जाहीर करावा आणि संबंधित लोकांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सारथी समोर पुन्हा एकदा आंदोलन होईल, असा इशाराच आबासाहेब पाटलांनी दिलीय.

सारथीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला

मराठा समाजासाठी सारथी संस्था कार्यरत करण्यात आली. या सारथीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी पूर्ण झालेली आहे. अहवाल त्या ठिकाणी आलेला आहे, पण सरकार अहवाल जाहीर करण्यात तयार नाही. सरकारनं लवकरात लवकर हा अहवाल जाहीर करावा, गैरव्यवहार करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावेत, अन्यथा सारथीच्या समोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्धारही आबासाहेब पाटलांनी बोलून दाखवलाय.

संबंधित बातम्या:

Sambhaji Raje | सरकारनं आमच्या मागण्यांची दखल घेतली, सरकारपुढे 6 मागण्या ठेवल्या : संभाजीराजे

एकटा संभाजी काय करेल, 48 खासदारांनी ताकद द्या, वडील शाहू महाराजांचं पुत्रप्रेम कोल्हापूरकरांनी पाहिलं!

Announce the inquiry report of the sarthi, otherwise we will agitate, warned Abasaheb Patil of maharashtra govt

Published On - 5:50 pm, Sun, 8 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI