AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात तब्बल 21 हजार बोगस सिमकार्ड? पोलिसांची कारवाई, इतके गुन्हेगार आले रडारवर

भारत सरकारच्या टेलिकॉम विभागाच्या नियमानुसार एका व्यक्तीला आपल्या आधार कार्डवर एकूण 9 सिम घेता येतात. पण, हे सर्व सिम फक्त एक व्यक्ती वापरू शकत नाही. त्यामुळे काही जणांनी अनधिकृतपणे अनेक सिमकार्डही घेतली आहेत.

राज्यात तब्बल 21 हजार बोगस सिमकार्ड? पोलिसांची कारवाई, इतके गुन्हेगार आले रडारवर
SIM CARD COMPANY Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Aug 04, 2023 | 9:10 PM
Share

मुंबई । 4 ऑगस्ट 2023 : मोबाईलसाठी कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड घेताना दूरसंचार विभागाने काही मर्यादा घातली आहे. यानुसार एका व्यक्तीला जास्तीत जास्त 9 सिम कार्ड घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावावर ९ पेक्षा जास्त सिम कार्ड असल्यास अशा ग्राहकांची सेवा खंडित करण्याचे निर्देश दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. मात्र असे असतानाही एका व्यक्तीच्या नावावर एक दोन नव्हे तर तब्बल 21 हजार बोगस सिमकार्ड वितरित झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

भारत सरकारच्या टेलिकॉम विभागाच्या नियमानुसार एका व्यक्तीला आपल्या आधार कार्डवर एकूण 9 सिम घेता येतात. पण, हे सर्व सिम फक्त एक व्यक्ती वापरू शकत नाही. त्यामुळे काही जणांनी अनधिकृतपणे अनेक सिमकार्डही घेतली आहेत. मात्र, याबाबत मुख्य आधारकार्ड धारकाला याची माहिती नसते.

राज्यात एकाच व्यक्तीच्या नावे आणि फोटोच्या आधारे शेकडो बोगस सिम कार्ड घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मे 2023 मध्ये हा घोटाळा झाला असून राज्यात तब्बल 21 हजार बोगस सिमकार्ड असल्याची माहिती उजेडात आली आहे.

बोगस पध्दतीने घेतलेल्या या सिम कार्डचा वापर गुन्हेगारांकडून करण्यात येत असून याची पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई सुरु केलीय. बनावट फोटो आणि कागदपत्रांचा वापर करून खरेदी केलेले राज्यातील 21,031 सिमकार्ड दूरसंचार विभागाने खंडित केले आहेत.

बोगस सिमकार्ड वापराच्या अनुषंगाने राज्यातील 9 पोलीस घटकांमध्ये एकूण 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी निष्पन्न 46 आरोपींपैकी 25 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी 1664 बोगस सिमकार्ड वितरीत केल्याची बाब तपासामध्ये उघड झाली आहे.

सायबर गुन्ह्यांमध्ये सामील असलेले हे सिमकार्ड ब्लॉक करण्याकरिता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्राने ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. त्याअनुषंगाने पोलीस महासंचालक कार्यालयाच्या दिनांक 7 जुलै 2023 रोजीच्या परिपत्रकान्वये या पोर्टलवर सायबर गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या सिमकार्डची माहिती दाखल करण्याच्या सूचना सर्व पोलीस घटकांना दिल्या आहेत अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिली आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.