AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदूबाबा खरात हा भाजपचा प्रचारक होता, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, आणखी काय दावे?

Sanjay Raut on Ashok Kharat : अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता खळबळजनक आरोप केला आहे.

भोंदूबाबा खरात हा भाजपचा प्रचारक होता, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, आणखी काय दावे?
Raut and KharatImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 25, 2026 | 2:33 PM
Share

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे नवनवीन कारनामे दररोज समोर येत आहेत. अनेक राजकीय नेतेही अशोक खरातच्या संपर्कात होते हेही समोर आले आहे. काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याप्रकरणी निवेदन सादर करत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. यात अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपामुळे भाजपची झोप उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आधीच कारवाई करायला हवी होती – राऊत

संजय राऊत यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर बोलताना म्हटले की, नाशिकच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली आहे. पण महिलेने तक्रार करेपर्यंत वाट का पहायची? फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून याची कल्पना हवी होती. त्यांनी तात्काळ धाडी घालून हे प्रकार थांबवायला हवे होते. हे केलं असत तर अनेकांची आयुष्य वाचली असती, कदाचित प्राण वाचले असते. याला सरकार जबाबदार आहे अस म्हणाव लागेल.

खरात भाजपचा प्रचारक होता – राऊत

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, क्रूर कृत्य घडत होती याची माहिती मुख्यमंत्री यांना होती. एका महिलेच्या तक्रारीची तुम्ही वाट पाहत बसलात हे चुकीचं आहे. नाशिक सोडून द्या. नाशिक पोलिसांची ती फॅशन झाली आहे. नाशिक जर कायद्याचा बालेकिल्ला असता तर खरात सारखी प्रकरणं निर्माण झालीच नसती. बीडमध्ये कोण आहे तिथे? हे भाजपचे हस्तक आणि समर्थक आहेत. खरात हा भाजपचा प्रचारक होता. बच्चू कडू यांना आशीर्वाद देतात की भाजपचे मंत्री बनून इथे तुम्ही या. निवडणूक काळात अशोक खरात भक्तांची मदत घेऊन मतदान करा अस सांगत होता. आमच्या विरोधात काहीतरी सुरू आहे अस लोकांना वाटल्याने हे प्रकरण बाहेर आलं.

महिलांचे फोटो समोर येतात ही गंभीर बाब

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, ‘भाजपने याचं प्रायश्चित केलं पाहिजे. तुम्ही सभागृहात काहीही सांगितलं तरी कोणी विश्वास ठेवणार नाही. महिलांची बेअब्रू ही राज्यात पहिल्यांदा होत आहे. जप्त केलेले मोबाईल पोलिसांकडे आहेत, ते गृह खात्याअंतर्गत आहे. कायद्याच्या बालेकिल्ल्यातून महिलांचे फोटो येत आहेत हे गंभीर आहे. कोणाचं षडयंत्र आहे हे समोर आल पाहिजे’

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?