आईग्गं!! 155 किलोची गर्भवती, ना मापाचा वजन काटा, ना ऑपरेशन टेबल, ना गाऊन.. औरंगाबादेत शर्थीचे प्रयत्न!

अशा केसमध्ये रक्ताच्या गाठी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यासाठी विशेष इंजेक्शनचा डोसही देण्यात आला. सदर महिलेने 3.5 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. हे तिचे दुसरे अपत्य आहे.

आईग्गं!! 155 किलोची गर्भवती, ना मापाचा वजन काटा, ना ऑपरेशन टेबल, ना गाऊन.. औरंगाबादेत शर्थीचे प्रयत्न!
औरंगाबादेत 155 किलो वजनाच्या महिलेची सुखरुप प्रसूती
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 3:09 PM

औरंगाबादः डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेचे वजन (Overweight lady) अवाढव्य. हे मोजण्यासाठी आधी विशेष वजन काट्याची व्यवस्था करावी लागली. सगळ्या तपासण्या केल्यानंतर आता प्रसूतीची वेळ आली. पण महिलेच्या डिलिव्हरीसाठी (delivery of woman) एक ऑपरेशन टेबर पुरतोय कुठे, आता काय करायचं, असा मोठा प्रश्न औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातील डॉक्टरांसमोर होता. अखेर हे आव्हान पेलायचं आणि रुग्णालयात आलेल्या महिलेची सुखरुप डिलिव्हरी करायची, असा निश्चय डॉक्टरांनी केला आणि हा प्रयत्न यशस्वीदेखील झाला. सिझेरियन प्रसूतीनंतर आता माता आणि बाळ हे दोघेही सुखरुप आहेत. विशेष म्हणजे एवढा जास्त बॉडी मास इंडेक्स असलेल्या जगातील फक्त सहाच महिलांवर अशी शस्त्रक्रिया (Rarest surgery ) झाली होती. औरंगाबादमधली ही सातवी केस ठरली.

डॉक्टरांनी सांगितली केस हिस्ट्री

घाटी रुग्णालयात जगातील अशा प्रकारची अत्यंत गुंतागुंतीची सातवी शस्त्रक्रिया पार पडली. अशी माहिती येथील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली. या केसची हिस्ट्री सांगताना ते म्हणाले, ही 27 वर्षीय महिला घाटीतील डॉ. विजय कल्याणकर यांच्या पथक क्रमांक 3 मध्ये दाखल होऊन उपचार घेत होती. तिचे वजन 155 किलो असून उच्च रक्तदाब, मधुमेह होता. तसेच तेवढ्या आकाराचा ना ऑपरेशन टेबल बोता, ना रुग्णाच्या आकाराचा गाऊन. अखेर हे आव्हान पेलायचंच, असं डॉक्टरांनी ठरवलं. 24 जानेवारी रोजी ही गुंतागुंतीची सिझेरियन प्रसूती यशस्वी करण्यात आली.

प्रमाणाबाहेर असं काय काय?

– सामान्यतः महिलांचा बॉडी मास इमडेक्स 20 ते 25 दरम्यान असतो. मात्र या महिलेचा बीएमआय 66 होता. – रक्तदाब मोजण्याच्या यंत्रात महिलेचा दंड मावत नव्हता. म्हणून खास उपकरण आणावे लागले. – वजन मोजण्यासाठीही मोंढ्यात असतो, तसा काटा आणण्यात आला. – सिझेरियन करण्यासाठी दोन मोठे ऑपरेशन टेबल जोडण्यात आले. – सामान्य सिझेरियन करण्यासाठी पाऊण तास पुरतो, पण या महिलेच्या प्रसूतीसाठी अडीच तास लागले. – अशा केसमध्ये रक्ताच्या गाठी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यासाठी विशेष इंजेक्शनचा डोसही देण्यात आला. – सदर महिलेने 3.5 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. हे तिचे दुसरे अपत्य आहे.

2 महिन्यांपासून उपाचारांसाठी डॉक्टरांची फौजच

सदर महिलेवर दोन महिन्यांपूर्वी उपचारास सुरुवात झाली. आधी ती एकाच जागी बसून राहत होती. त्यामुळे वॉर्डात तिला दररोज चालण्यास सांगितले गेले. फुप्फुसाचे व्यायाम करुन घेण्यात आले. शरीराच्या विविध भागांवर बुरशीचा संसर्ग होता. चरबी प्रचंड वाढल्याने बाळाचे ठोकेच ऐकू येत नव्हेत. त्यासाठी दिवसभरातून तीन वेळा सोनोग्राफीच्या माध्यमातून बाळाचे ठोके तपासले जात होते. तिला एका जागेवारून दुसरीकडे हलण्यासाठीही मदतीची गरज होती. प्रचंड वजनामुळे तिला सांभाळणेही कठीण होते. व्हीलचेअरमध्येही ती मावत नव्हती. अशा स्थितीत तिला हळू हळू प्रसूतीयोग्य बनवण्यात आले.

डॉक्टरों की वजह से जिंदा हूँ…

घाटीच्या वॉर्ड 26 मध्ये 11 दिवसांची बाळंतीण असलेली ही महिला म्हणाली, ही माझी दुसरी प्रसूती होती. वयाच्या 16 व्या वर्षापासून अचानकच वजन वाढत गेले. 2014 मध्ये लग्न झाले. तेव्हा वजन 90 किलो होते. वजनामुळे आजारही वाढले. 2017 साली पहिली प्रसूती झाली. आता दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी खूप हाल झाले. शासकीय रुग्णालयात रुग्णांचे हाल होतात, असे ऐकले होते, पण माझ्यासाठी डॉक्टरांची टीम रात्रंदिवस काम करत होती. आज त्यांच्यामुळेच मी जिवंत असल्याचे तिने सांगितले.

इतर बातम्या-

नागपुरात चोवीस तासांत कोरोनाचे पाच बळी; प्रशासनासोबत सामाजिक संस्थांचाही जनजागृतीवर भर

Icc under 19 cricket world cup: सेंच्युरी, पाच विकेट घेणाऱ्या अक्रमचा हा ‘चक्रम’ करुन सोडणारा SIX नक्की पाहा VIDEO

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.